Home विदर्भ ST महामंडळाच्या शासनात विलीनिकरण च्या मागणीसाठी मनसेचा आक्रोश मोर्चा….।

ST महामंडळाच्या शासनात विलीनिकरण च्या मागणीसाठी मनसेचा आक्रोश मोर्चा….।

319

यवतमाळ – संपूर्ण महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.त्या पार्श्वभमीवर यवतमाळ जिल्हा मनसेच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार , मनविसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नेतृत्त्वात दिनांक १ डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा आक्रोश मोर्चा धडकणार आहे.एसटी महामंडळाचे आणि कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा निघणार आहे.या मोर्चात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय , त्यांची पत्नी , मुले, आणि आप्तस्वकीय आणि मनसेचे जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.सर्व सामान्य जनतेच्या जीवाची काळजी घेणाऱ्या आणि तूटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी सर्वसामान्य जनतेने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन मनसेचे देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, साजिद अब्दुल शेख, ॲड अमित बदनोरे, विकास पवार, डेव्हिड शहाने, गजानन भालेकर, सादिक शेख,सचिन येलगंधेवार, शंकर वरघट, सुनील चव्हाण,संदीप लांडे,आकाश राहाटे,तृषाल गब्राणी,आकाश देशमुख,बाळासाहेब कठाले यासह एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात येत आहे.