Home सातारा आहो आश्चर्य ,  “दीड कोटीच्या विम्या साठी त्याने आपल्या मित्राला कार सह...

आहो आश्चर्य ,  “दीड कोटीच्या विम्या साठी त्याने आपल्या मित्राला कार सह जाळले”

51
0

पोलीस तपासात उघड झाली बाब…!!

अमीन शाह

सातारा , दि. २५ :- १ कोटी ५० लाखाच्या विम्यासाठी एका तरूणाने आपल्याच जीवलग मित्राची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील कोरेगाव परिसरातील बोधेवाडी घाटात मंगळवारी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात खूनाचा गुन्हा नोंदवला आहे. व्यवसायात झालेल्या नुकसान भरून काढण्यासाठी आरोपीन स्वताचा अपघाती मृत्यू भासवायचा आणि विमा रक्कम घेऊन पळून जाण्याचा कट त्याने रचला होता. मृताची शरीर यष्टी हुबेहूब आरोपीसारखीच होती. यामुळे आरोपीने आपल्याच मित्राचा खून करून कारसह त्याला पेटवून दिल. मात्र, अवघ्या ४ दिवसांत स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाला छडा लावला.

सुमित मोरे असे आरोपीचे नाव असून तो आई वडिलांसह सायन- कोळीवाडा येथे राहत होता. सुमित गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रोटीन पावडर विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. मात्र, त्याला या वायवसायत मोठे नुकसान झाले होते . त्यामुळे त्याच्यावर कर्जही झाले. कर्ज फेडण्यासाठी त्याने मुंबईतील आपल्या एका मित्राच्या साह्याने एका खाजगी बॅंकेतून स्वत:च्या दीड कोटी रुपयांचा विमा उतरवविला होता. दरम्यान, त्याने आपला अपघाती मृत्यू भासवून विम्याची रक्कम घेऊन पळवून जाण्याचा कट रचला. यासाठी त्याने आपला मित्र तानाजी आवळे याला लक्ष्य केले. सुमीतने तानाजी याला बाहेरगावी यायचे आहे. यासाठी तू दहिवडी येथे ये, असा निरोप दिला. त्यानुसार तानाजीला घेऊन तो निघाला. जेव्हा कार बोधेवाडी घाटात पोहचल्यानंतर त्याच्या डोक्यात लाकडी स्टंम्पने वार केला, त्यात तानाजी जागीर ठार झाला.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गुरूड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमीतच्या कुटुंबियातील सदस्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे दुख दिसत नसल्यामुळे पोलिसांना वेगळाच संशय आला. त्यानुसार पोलिसांनी सुमतीच्या भावाकडे चौकशी केली असता त्याने पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. तसेच सुमीत हा जेजुरीला लपून बसला आहे, अशी महिती त्याने दिली.

Unlimited Reseller Hosting