Home विदर्भ वाह रे नात , मौज मजा करण्यासाठी आपल्या आजीलाच मारून टाकले ,

वाह रे नात , मौज मजा करण्यासाठी आपल्या आजीलाच मारून टाकले ,

469
0

 

पोलिसांची कामगिरी ,

अमीन शाह

: नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत निवृत्त महिलेच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. महिलेच्या नातीनेच तिचा बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्राच्या मदतीने हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी बॉयफ्रेंड आणि त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतलं आहे. मात्र, नात अजूनही फरार आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच नातीनेच आजीचा गळा चिरुन हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

नेमकं प्रकरण काय?

नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सप्तक नगरात 62 वर्षीय वृद्धेची हत्या करण्यात आल्याची घटना 14 मे रोजी पुढे आली होती. विजयाबाई पांडुरंग तिवलकर असे मृतक महिलेचे नाव आहे. त्या सेवानिवृत्त असून एकट्याच राहत होत्या. त्या राज्य राखीव पोलीस दलातून निवृत्त झाल्या होत्या. त्यांचा एक मुलगा हा देखील एसआरपीएफमध्ये कार्यरत आहे. त्याची पोस्टिंग हिंगणा येथे आहे. मात्र मृतक विजया या मुलासोबत राहत नसून वेगळ्या राहायच्या ,

घरकाम महिलेमुळे हत्येची घटना उघड

हत्येच्या आधल्या दिवशी विजया शेजारच्यांसोबत बोलल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत विजया घराबाहेर पडल्या नव्हत्या. दुपारच्या वेळात त्यांच्याकडे काम करणारी महिला घरी आली असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या. घरकाम करणाऱ्या महिलेने या संदर्भात शेजारच्या लोकांना सूचना दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना देखील माहिती कळवण्यात आली.

पोलिसांकडून तपास

मृतक विजया यांचा गळा चिरण्यात आला होता. तसेच त्यांच्या डोक्यावर देखील जखमा आढळून आल्या होत्या. मृतक महिलेच्या घरातील महागड्या वस्तू आणि अंगावरील दागिने जशास तसे असल्याने चोरीच्या उद्देशाने त्यांचा खून झाला नसावा, असा अंदाज पोलिसांनी लावला होता.

आजीच्या संपत्तीवर मौज मजा करण्यासाठी नातेकडून हत्या ,

पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली. महिलेच्या अल्पवयीन नातीने आजीकडे असलेला पैसे आणि संपत्तीच्या लोभापोटी हे घडवून आल्याचं समोर आलं आहे. आजीचा पैसा आणि संपत्तीवर आपल्याला मौज करता येईल हा उद्देश ठेऊन ही हत्या केली असल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे ,