Home महत्वाची बातमी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल ,

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल ,

40
0

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल ,

 

बुलडाणा : केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चार कार्यकर्त्यांविरुद्ध आज , 1 डिसेंबर रोजी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . आज सकाळी वरवंड ते डोंगरखंडाळा रोडवरील भास्करराव शिंगणे विद्यालयासमोरील रस्त्यावर चंद्रशेखर चंदन ( रा . व्यंकटेशनगर बुलडाणा ) , आकाश माळोदे ( रा . अफजलपूर वाडी ) , दत्तात्रय जेऊघाले ( रा . वरवंड ) , समाधान धंदर ( रा . वरवंड ) यांनी केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून दिल्लीत सुरू केलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सरकारचा निषेध नोंदवला . याची माहिती पोलीस निरिक्षक श्री . नवलकर यांना मिळाली . घटनेची पाहणी करण्यासाठी पोलीस पथक घटनास्थळी गेले असता पुतळा दहन केल्याचे दिसून आले . त्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांविरद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणात दुर्गासिंग मोतीसिंग ठाकूर यांनी फिर्याद दिली . त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास पो.हे.काँ . सुभाष चोपडे करत आहेत .