Home विदर्भ नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम त्वरित स्थगित करून केलेल्या नुकसानाची तात्काळ नुकसान...

नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम त्वरित स्थगित करून केलेल्या नुकसानाची तात्काळ नुकसान भरपाई करावी…..!

132

यवतमाळ , दि. १२ :- कोरोना सारखा आजार आपले पाय शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागातही पसरवत आहे.

लॉकडाऊनमुळे गत तीन महिने हाताला काम नाही.कर्ज काढून दुकान टाकून दोन वेळच्या भाकरीची सोय करत कसाबसा संसाराचा गाडा ओढणे सुरू असतांनाच नगरपरिषद यवतमाळ तर्फे अतिक्रमण हटवा मोहिमेला सुरुवात करण्यात आली. ही मोहीम तात्काळ स्थगित करण्यात यावी व केलेल्या नुकसानीची ताबडतोब भरपाई करण्यात यावी अन्यथा मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला..
कोरोनामुळे आर्थिक स्थिती प्रचंड हलाकीची झाली आहे. हातावर आणून पानावर खाणे अशी अवस्था समाजाच्या प्रत्येक घटकाची आहे .अश्यातच ही कारवाई म्हणजे गरिबांसमोर जगावे की मरावे हा प्रश्न विचारणारी आहे. शासनाने सामान्य जनतेचा अंत पाहू नये, मायबाप सरकारने भूमिका घ्यावी लोकांना जगण्यासाठी आधार द्यावा अशी भावनिक साद यावेळी घालण्यात आली.आणि अतिक्रमण मोहीम अनिच्चीत काळासाठी स्थगित करावी व नुकसान भरपाई करावी या मागणीचे निवेदन आज नगरपालिकेचे गटनेते चंद्रशेखर चौधरी,नगरसेवक जावेद अंसारी,ललित जैन,प्रद्युम्न जवळेकर,आनंद गिरपुंजे आदींनी निवासी जिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांना सादर केले.