विदर्भ

लोणीचे ग्रामसेवक राजेंद्र भोवते लाचलुचपत प्रतिबंधक अधिकार्यांच्या जाळ्यात.!

Advertisements
Advertisements

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील आगरगांव येथील तक्रारदार 29 वर्षीय युवकांनी मिळालेल्या कंत्राट नुसार लोणी देवळी तालुक्यातील लोणी ग्रामपंचायत अंतर्गत पैंटिंग चे काम केले होते. व काही काम हे बाकी होते व केलेल्या कामाचं बिल एकूण 1,40, 000/-रु तक्रारदार यांना मिळाले होते.. तरी काढून दिलेल्या बिलाचा मोबदला म्हणून देवळी पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक राजेन्द्र आत्माराम भोवते यांनी तक्रारदार यांना 7 हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती 5000/-रु ची मागणी करून उर्वरित 2000/-रु नंतर देण्याबाबत चे पडताळणी दरम्यान स्पष्ट मागणी करून ग्राम सेवक राजेन्द्र आत्माराम भोवते यांनी आज 22 मे रोजी पंचासमक्ष लाच रक्कम स्वीकारल्याने देवळी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक श्रीमती रश्मि नांदेडकर लाच प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र, नागपूर, श्री.राजेश दुद्दलवार, अप्पर पोलीस अधिक्षक, परिक्षेत्र नागपूर, श्री.विजय माहुलकर पोलिस उप अधीक्षक, परीक्षेत्र नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. गजानन विखे, पोलीस उपअधीक्षक,सुहास चौधरी, पोलीस निरीक्षक, पो.हवा रोशन निंबोलकर, नापोका अतुल वैद्य ,पोशी सागर भोसले,कैलास वालदे, मपोशी पल्लवी बोबडे, अपर्णा गीरजापुरे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा यांनी कार्य वाही केली.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

बेशिस्तांवर कारवाईचा बडगा , “जिल्हाधिका-यांकडून इर्विन चौकात बेशिस्तांवर कारवाई”

मनीष गुडधे    अमरावती – कोरोनाबाधितांची संख्या वाढत चाललेली असतानाही मास्कचा वापर न करता बेपर्वाईने ...
विदर्भ

” सितादही ” पुर्वीच पांढर्या सोन्याला काळा डाग , “आभाळ फाटले”

आयुष्याचा ७\१२कोरा…! कर्जाची चिंता….! भूमिपुत्र हतबल…! मदतीची गरज…! देवानंद जाधव यवतमाळ – सध्या आभाळाच्या सारीपाटावर पावसाचा ...
विदर्भ

अकोला जिल्ह्यात प्रसूती झालेल्या महीलेला व तिच्या बाळाला उपचारासाठी चक्क बैलगाडीतून करावा लागला प्रवास…  

    अकोट. देवानंद खिरकर स्वातंत्र्याला ७४ वर्ष उलटली मात्र गावखेड्यातील वाहतूक परिस्थिती अजून हि ...
विदर्भ

संस्थात्मक अलगीकरणात राहण्यास इच्छुक नसलेल्या अतिसौम्य लक्षणे असणा-या रुग्णांना गृहअलगीकरणात राहण्याची परवाणगी

योगेश कांबळे वर्धा , दि.22 – सध्या जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ...