Home बुलडाणा देऊळगाव मही येथील कोमल मोरे या विद्यार्थीनीकडे १ दिवसाचा प्रयोग शाळेचा कारभार

देऊळगाव मही येथील कोमल मोरे या विद्यार्थीनीकडे १ दिवसाचा प्रयोग शाळेचा कारभार

454

देऊळगाव राजा – रवि आण्णा जाधव

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबण्यात येत आहेत. महिला दिनानित्त आयोजित सप्ताहाला एक दिवसाचा जिल्हाधिकारी उपक्रमापासुन सुरूवात करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर ग्रामीण रूग्णालयात देऊळगाव मही येथिल महाराष्ट्र शासनाच्या हिंन्द लॅब प्रयोगशाळेचा एक दिवसाचा सांकेतिक कार्यभार कोमल मोरे या विद्यार्थ्यीनीकडे हिंन्द लॅब देऊळगाव मही चे प्रमुख रंजित खिल्लारे यांनी सोपवून एक प्रकारे महिलांचा सन्मान केला आहे. या उपक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. पंडित यांनी मोलाचे मार्गदर्शन केले .. या उपक्रमाचा हेतू महिला सक्षमिकरन असुन महिलांनी स्व:तच्या पायावर उभे राहून गगनभारी घ्यावी हा मानस आहे . यावेळी ग्रामीण रूग्णालय देऊळगावमही यांच्या वतिने वैद्यकीय अधिकारी डाॅ.बोर्डै,दंत शल्य चिकित्सक डाॅ. शेखर , प्रयोगशाळा साहाय्यक विशाल भगत,संदिप झिणे, सुरक्षा रक्षक अशोक वाघ, हे उपस्थित होते तर हिंन्द लॅबचे वरीष्ठ जि.एम मानकरी, पाखरे,तायडे , यांचे मार्गन लाभले