Home मराठवाडा शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये पिण्याच्या पाण्यासह वापराच्या पाण्याचा गंभीर

शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये पिण्याच्या पाण्यासह वापराच्या पाण्याचा गंभीर

157
0

सय्यद नजाकत – बदनापूर

जालना – शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मागील पाच वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासह वापराच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला होता त्या मुळे या भागातील नागरिक सातत्याने नगर पंचायत कडे पाठपुरावा करीत होते मात्र कोणीच लक्ष देत नसल्यामुळे अखेर मुख्य अधिकारी व उपनगर अध्यक्षांनी गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन या वार्डात बोर घेऊन पाणी उपलब्ध करून दिल्याने नागरियाकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे
बदनापूर शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये गेल्या पाच वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्मण झालेला होता त्याच बरोबर वापराचे पाणी देखील अपुरे होते त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत होते मात्र नगर पंचायत पदाधिकारी लक्ष देण्यास तय्यार नव्हते,या भागातील नागरिकांना विकत पाणी घेण्याची वेळ आलेली होती,वारंवार नगर पंचायतीकडे तक्रारी करून देखील उपयोग होत नसल्याने नागरिक वैतागले होते
प्रभाग नऊ मधील पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्य अधिकारी डॉ.पल्लवी अंभोरे,उपनगर अध्यक्ष शेख युनूस लालमिया व नगरसेविका उजमा काजी यांनी बैठक घेऊन या भागातील नागरिकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तात्काळ बोर घेण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाला दिले असता पाणी पुरवठा विभागाने बोर करून पाणी उपलब्ध करून दिले आहे सदर बोर नागरिकांसाठी खुला करून देण्यात आला असून उपनगर अध्यक्ष शेख युनूस व नगर सेविका पती काजी मुद्द्तशीर यांच्या उपस्थित बोर खुले करून दिल्याने पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
शेख युनूस -उपनगरअद्यक्ष
बदनापूर शहरातील प्रभाग नऊ मध्ये मागील पाच वर्षांपासून पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता ,नागरिकांना होणारी अडचण लक्षात घेऊन मुख्य अधिकारी डॉ.पल्लवी अंभोरे यांनी तातडीने मागणी मेनी करून बोर करण्याचे आदेश दिले व बोर घेऊन नागरिकंना पाणी खुले करून देण्यात आले आहे.