Home मराठवाडा जागतिक महिला दिन विशेष….!

जागतिक महिला दिन विशेष….!

119

कर्तबगार महिलेची शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी….!!

सय्यद नजाकत – बदनापूर

जालना – बदनापूर तालुक्याच्या शैक्षणिक विकासात मोलाचा वाटा निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या माध्यमातून एक लढाऊ महिला प्राचार्या डॉ.एम.डी.पाथ्रीकर यांनी उचलला असून १९९७ मध्ये बदनापूर सारख्या ग्रामीण भागात वरिष्ठ शिक्षण उपलब्ध करून ग्रामीण भागातील विद्यर्थिनींना शिक्षणाची दारे उघडी करून दिली व अनंत अडचणींवर मात करीत प्राचार्या एम.डी.पाथ्रीकर यांनी सतत २३ वर्षांपासून शैक्षणिक कार्य चालविले आहे
बदनापूर तालुका १९९२ मध्ये अस्थित्वात आला परंतु हा तालुका शैक्षणिक दृष्टया अत्यंत मागासलेला तालुका म्हणून नावारूपास होता,ग्रामीण तालुका असल्याने व केवळ या भागात माध्यमिक पर्यंत शिक्षणाची सोया असल्याने पालक वर्ग आपल्या मुलींना उच्चशिक्षणासाठी शहरात पाठविण्यास घाबरत असे,ग्रामीण भागातील विद्यर्थीनींची अडचण लक्षात घेऊन प्राचार्या डॉ.एम.डी.पाथ्रीकर यांनी निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या माध्यमातून १९९७ मध्ये पदवी शिक्षण उपलब्ध करून दिले पाठोपाठ उच्चमाध्यमिक शिक्षणाची दारे उघडली त्यामुळे बदनापूर तालुक्यातील विद्यर्थिनीना पदवी पर्यंतचे शिक्षण बदनापुरात उपलब्ध झाल्याने शिक्षणाची मुली मध्ये गोडी वाढली व तालुक्यातील हजारो मुली पदवी पर्यंत शिक्षण घेऊ लागल्या हे सर्व घडले ते केवळ धाडसी महिला प्राचार्या डॉ.एम.डी.पाथ्रीकर यांच्यामुळे !
निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या माध्यमातून बदनापूर तालुक्यात शैक्षणिक वातावरण निर्मिती झाली दरम्यान अनंत अडचणी आल्या परंतु कोणत्याही अडचणींना न घाबरत पाथ्रीकर यांनी आपले शैक्षणिक ध्येय डोळ्यासमोर ठेऊन कार्य सुरूच ठेवले व आज तालुक्यात माध्यमिक,उछमाध्यमिक,पदवी,पदव्युत्तर शिक्षणासह इंग्रजी माध्यम सिबीएससी उपलब्ध झालेले आहे त्याच बरोबर एम.बी.ए.,औषधनिर्माणशास्त्र असे उच्च शिक्षण सहजपणे बदनापूर सारख्या मागासलेल्या तालुक्यात एका महिलेने उपलब्ध करून दिलेले आहे .

डॉ.एम.दडी.पाथ्रीकर-प्राचार्या
बदनापूर तालुका शैषणिकदृष्टया अत्यन्त मागासलेला होता या भागातील पालक आपल्या मुलींना केवळ दहावी पर्यंत शिक्षण झाले कि पुढील शिक्षणासाठी शहरात पाठविण्यास भीत होते त्यामुळे मुली उच्चशिक्षणापासून वंचित राहत होते त्यामुळे आम्ही संस्थेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक कोर्स सुरु करून चांगले शिक्षण उपलब्ध करून दिले,या कामात महिला असल्यामुळे मला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले मात्र आम्ही भीती न बाळगता शैक्षणिक कार्य सुरूच ठेवले .