
अमीन शाह
बुलडाणा , दि. २७ :- शेगाव तालुक्यातील नऊ वर्षीय बलिकेला घरात नेऊन 55 वर्षीय नराधमाने लैगिक अत्याचार केल्याची अत्यंत दुर्दैवी संतापजनक निंदाजनक घटना तालुक्यातील पाडसुळ येथे घडली.याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी नराधम आरोपीला रात्री उशीरा अटक केली आहे.
पिडित बालिकेची आई शेतातून सायंकाळी घरी परत आल्यावर सदर घटना तिला समजली. त्यानंतर तिने शेगाव ग्रामीण पो स्टे ला येऊन रात्री याबाबत फिर्याद दाखल केली.गौतम पुंडलिक परघरमोर वय 55 वर्ष रा.पाडसुळ ता.शेगाव असे नराधम आरोपीचे नाव आहे. त्याने पीडित बालिकेच्या भावाला 10 रु देऊन दुकानात पाठवले व बालिकेचा हाथ धरून त्याचे घरात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला.पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विरुध्द अपराध क्र. 60/2020 कलम 376,376(3),376(अ)(ब)भांदवीसह कलम 4,8, बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायदा(पोक्सो) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीणचे ठाणेदार गोकुळ सुर्यवंशी यांनी ताफ्यासह घटनास्थळी भेट देत आरोपीला अटक करून या घटनेचा तपास केला.