Home मराठवाडा मराठवाडा कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे ‘मराठी भाषा गौरव’ दिन साजरा

मराठवाडा कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे ‘मराठी भाषा गौरव’ दिन साजरा

64
0

अब्दुल कय्युम

औरंगाबाद. दिनांक २७ फेब्रुवारी २०२०. मराठवाडा कॉलेज ऑफ एज्युकेशन डॉ. रफिक झकेरिया कॅम्पस रोझे बाग औरंगाबाद येथे प्राचार्य डॉ. मझहर फारुकी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठी भाषा गौरव’ दिन साजरा करण्यात आला. डॉ. नवीद उस सहेर यांच्या अध्यक्षतेत सदर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात मराठी भाषेचे तज्ज्ञ, साहित्यिक, लेखक, कवी व मुस्लिम मराठी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. आरेफ ताजोद्दीन हे उपस्थित होते. या प्रसंगी मंचावर मराठवाडा कॉलेज ऑफ एज्युकेशन चे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. शेख इम्रान रमजान, डॉ. तलत नसीर, डॉ. कनिझ फातेमा, डॉ. शेख शकील मजीद उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ. आरेफ ताजोद्दीन यांनी सांगितले की मराठी भाषा हि कोणा एका समाजाची, पंथाची किंवा धर्माची भाषा नव्हे तर महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व नागरिकांची भाषा आहे. आज प्रत्येक भाषेला कुठल्या ना कुठल्या धर्माशी निगडित करण्यात आले आहे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. डॉ. शेख शकील मजीद यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचे महत्व, शालेय स्तरावर मराठी भाषेप्रति विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणाऱ्या विविध उपक्रमा विषयी मार्दर्शन केले. त्यांनी सांगितले की मराठी आपली शासकीय भाषा आहे. विविध स्पर्धा परीक्षेसाठी, शासकीय नोकऱ्यांसाठी, पोलीस भरती साठी मराठी भाषा येणे अत्यंत गरजेचे आहे. अध्यक्षीय भाषणात डॉ. नवीद उस सहेर यांनी सर्वप्रथम उपस्थितांना ‘मराठी भाषा गौरव’ दिना निमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना मराठी विषय हे इन्फॉरमेशन टेकनॉलॉजि (आई. टी.) च्या साहाय्याने शिकविले पाहिजे. या भाषेप्रती विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. कार्यक्रमात खान वहिदा हारून, प्रा. काशेफा अंजुम, डॉ. खान झीनत बानो, डॉ. तेहमिना नाझ, डॉ. खान तन्वीर हबीब, डॉ. शेख सुभान हसन, डॉ. मानेराव डी.ए., डॉ. वैशाली खोपटीकर, प्रा. सय्यद रिझवान, प्रा. अतिक इनामदार, प्रा. सोहेल झकीऊद्दीन हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अन्सारी खुर्शीद अहमद यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मराठवाडा कॉलेज ऑफ एज्युकेशन च्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.