Home विदर्भ विषारी वनस्पती खाल्ल्याने केळझर येथील सात जनावरे दगावली.!

विषारी वनस्पती खाल्ल्याने केळझर येथील सात जनावरे दगावली.!

58
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

पंधरा जनावरांना बाधा
शेतकर्‍यांचे मोठे नुकसान .!

वर्धा – जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील केळझर येथे विषारी वनस्पती खाल्ल्याने सात जनावरे दगावली असून पंधरा जनावरांना बाधा झाली आहे यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून या घटनेनंतर शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे इतर बिष बाधीत जनावरांना जगविण्यासाठी पशुधन पर्यवेक्षक केळझर यांची केविलवाणी धडपड सुरू आहे
येथील वसंतराव खंडाळे या पशुपालकाचे जनावरे दोन तीन दिवसांपूर्वी चराई क्षेत्रात चराई करिता गेली असता विषबाधा झाली यात त्याचे कडील एक रेडा, एक म्हैस, एक गाय व दोन वासरे दगावली तसेच शैलेंद्र भारती यांची एक वार तर वडगाव जंगली येथील गुरूदेव वैरागडे यांची एक कालवड यात दगावली ईतर बिष बाधीत जनावरावर पशुधन पर्यवेक्षक पेटकर यांचे कडून उपचार सुरू असताना गावात अजुन काही अशी विष बाधीत जनावरे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे जांघेत सुज येणे, बोटांनी नस दाबली तर ठसे उमटले, तोंडाला फेस येणे, तसेच पोटाची धाप लागणे अशी याची लक्षणे आढळून आली असून ढोरकाकडा ही वनस्पती खाल्ल्याने हि अशी बाधा येऊ शकते असे मत पशुधन पर्यवेक्षक पेटकर यांनी व्यक्त केले आहे.