Home मराठवाडा स्वरकल्याण संगीत विद्यालय आयोजित तृतीय वर्धापन दिनानिमित्त संगीत सभा 2020 उत्साहात संपन्न…

स्वरकल्याण संगीत विद्यालय आयोजित तृतीय वर्धापन दिनानिमित्त संगीत सभा 2020 उत्साहात संपन्न…

19
0

रवि गायकवाडऔरंगाबाद / बिडकीन – आज दि.२४ रोजी स्वरकल्याण संगीत विद्यालय आयोजित तृतीय वर्धापन दिनानिमित्त संगीत सभा यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली .

श्री.सुरेश विधाते ,श्री.प्रशांत मुंडे ,श्री.सुहास जागीरदार ,श्री.मनोज पेरे यावेळी यांची प्रमुख पाहुणे उपस्थिती होती. संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय राग , तराणा , नाट्यगीते , त्रिवट ,भजन ,गवळणी सादर केली .काही विद्यार्थ्यानी सामूहिक तबला वादन सादर केले.सूत्रसंचालन. शितल गायकवाड व कल्याणी तोगे यांनी केले.
तसेच विद्यालयाचे संचालक श्री .अनिल गायकवाड यांनीही आपले शास्त्रीय गायन सादर केले . त्यानंतर अतिथी कलाकार म्हणून श्री .सुरेश विधाते यांनी व्हायोलिन वादन सादर केले. त्यांना व्हायोलिनसाथ कु.अक्षय पवार ,तबल्यावर कु.सागर काटे व पखवाजावर श्री.उद्धव म.नवपुते यांनी साथसंगत केली .कार्यक्रमासाठी अक्षय पवार ,ऋषीकेश शेटे ,किरण गाडेकर ,पवन शिंदे ,संदेश कांबळे , कार्तिक गरड ,स्वप्नील वाघमारे यांनी परिश्रम घेतले .

Unlimited Reseller Hosting