Home मराठवाडा पाच वर्षीच्या निरागस चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधाम पोलिसांच्या ताब्यात

पाच वर्षीच्या निरागस चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधाम पोलिसांच्या ताब्यात

61
0

नांदेड , दि.२७ – ( राजेश भांगे ) –
लोहा तालुक्यातील सोनखेड येथे दिनांक २५ फेब्रुवारी रोजी पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळींबा फासणारी आणखी एक घटना घडली. सोनखेड येथे एका पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिला अचेत आवस्थेत जंगलात सोडून पळुन गेलेल्या नराधामास चोवीस तासांच्या आतच पोलिस पथकांनी ताब्यात घेतले. घडलेल्या या प्रकरणातील अज्ञात फरार आरोपी विरूद्ध पोक्सो कायद्या अंतर्गत सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. – व लवकरच आरोपीचे मुस्क्या आवळले जातील अशी माहिती पोलिसांनी दिली होती .
लोहा तालुक्यातील सोनखेड येथील एका पाच वर्षीय निरागस चिमुकलीचे दिनांक २५ फेब्रुवारी रोजी अज्ञात व्यक्ती ने काहितरी आमिश दाखवून अपहरण केले व सदर मुलगी घरी आली आली नसल्याचे कळताचे तिच्या पालकांनी सोनखेड पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिली असता सोनखेड पोलिसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन तत्काळ चिमुकल्या मुलीचा शोध घेतले असता पोलिसांना त्यात यश आले परंतु ती चिमुकली अत्यंत अत्यावस्थ व ह्रदयद्रावक आवस्थेत सापडली व तिच्यावरा अमानुष अत्याचार झाल्याचे समोर आले. चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार करणारा तो नराधाम आरोपी कोण आहे याची माहिती काढुन लवकरच आरोपी चे मुस्क्या आवळले जातील अशी माहिती ( ग्वाहि )पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी दिली होती.
त्यात त्यांनी आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना आदेश दिले त्यानुसार पोलिस उपाधिक्षक अभिजीत मस्के , धनंजय पाटील , पोलिस निरिक्षक व्दारकादास चिखलिकर , पोलिस निरीक्षक सुनिल पुंगळे , पोलिस उपनिरिक्षक प्रविण राठोड सोनखेडचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष आडे , यांनी आपल्या संयुक्त पोलिस पथकासह तत्काळ तपासाची चक्रे फिरवली व मोठ्या तत्परतेने चोवीस तासा च्या आतच आरोपी सुग्रीव बाबुराव मोरे (२८ ) या नराधामास ताब्यात घेतले. — सुरवातीलाच सोनखेड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने आता या गुन्ह्याचा तपास कंधार च्या पोलिस उपनिरिक्षक सुवर्णा उमाप यांच्या कडे देण्यात आले व आरोपी नराधामाने आत्याचार केल्याची कबुली सुद्धा दिली असे सुत्रांकडुन समजले.

तरी आज २७ फेब्रुवारी रोजी लोहा शहर बाजार पेठ कडकडित बंद ठेवण्यात आले व आरोपी ला करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी लोहा शहर सामाजिक संघटनेच्या वतिने करण्यात आली व या घटनेच्या निषेधार्थ लोहा शहर व्यापाऱ्यांनी आपली सर्व प्रतिष्ठाने दुकाने बाजार पेठ कडकडित बंद ठेवून निषेध नोदविले.