Home उत्तर महाराष्ट्र पत्नीची हत्या करून प्रेत पेट्रोल टाकून जाळले , “खळबळजनक घटना “

पत्नीची हत्या करून प्रेत पेट्रोल टाकून जाळले , “खळबळजनक घटना “

156

अमीन शाह

अहमदनगर , दि. २३ :- चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केला. यानंतर तिचा मृतदेह पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना राहता तालुक्यातील एकरुखे येथे घडली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर पती सुनिल लेंडे हा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने पत्नीचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सुनिल लेंडे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
सुनिल लेंडे हा पत्नी छाया (वय – 32) हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. शनिवारी संध्याकाळी शेतात गेल्यानंतर सुनील याने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडके मारून तिचा खून केला. त्यानंतर पत्नीचा मृतदेह शेतात ठेवून तो घरी आला. पत्नीच्या नातेवाईकाचे निधन झाले असून ती माहेरी गेली असल्याचे आई – वडिलांना सांगितले.
त्यानंतर रात्री एक पोते व पेट्रोल नेऊन पत्नीला शेतापासून जवळच जाळून टाकले. त्यानंतर स्वत:हून तो राहता पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर छाया यांचा भाऊ सुनील तरस याच्या फिर्यादीवरून लेंडे विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पुढील तपास राहता पोलीस करीत आहेत.