Home जळगाव 46 लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी

46 लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी

64
0

लियाकत शाह

भुसावळ : येथील भारत मोतीराम गिरणारे यांचे वडिलांचा नागपुर येथे तीन गुंठ्यांचा प्लॉट होता.सदर प्लॉट त्‍यांनी नागपूर येथील प्रसन्ना दत्तात्रेय टोकेकर यांना विकला असून त्याचा व्यवहार पूर्ण झाला आहे.गिरणारे यांचेकडून पैसे उकळण्याच्या उद्‍देशाने वाल्‍मिक नगरातील भुऱ्या बारसे याने फोन करून गिरणारे यांना संजय आवटे यांच्या कार्यालयावर बोलवले.
भारत गिरणारे तेथे आल्‍यावर भु-या बारसे याने व अन्‍य एका अनोळखी इसमाने गिरणारेंचा मोबाईल हिसकावून घेत त्यास बोलला की “नागपुरच्‍या प्लॉटचा विषय माझ्‍याकडे आला असुन त्‍या प्‍लाॅटचे ४६ लाख रु. मला आत्ताच हवे, अन्‍यथा तुझ्‍या परिवाराला सोडणार नाही अशी धमकी दिली. यानंतर आरोपी संजय आवटे याने देखील ४६ लाख रुपये आत्ताच्या आत्ता द्‍यावे लागतील नाहीतर तुझे काय खरे नाही अशी धमकी दिली.तसेच बोलेरो गाडी क्र.५५५ या गाडीत बसवून संजय आवटे यांचे साकरी फाट्यावरील फार्म हाऊसवर घेऊन गेले.तेथे गेल्यावर त्या सर्वांनी मिळुन गिरणारेंना मारहाण करून विहिरीत ढकलून देण्याची धमकी दिली.तसेच तेथे असलेल्या रशीद नामक इसम व एका अनोळखी इसमाने फिर्यादीस ४६ लाख रुपयांची खंडणी मागुन जीवे मारण्याची धमकी दिली होती.या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्‍यात ६०/२०२०,कलम ३६५, ३८४,३२३,१४३,१४७,५०४,५०६ प्रमाणे दि.२२ फेब्रुवारी रोजी रात्री गुन्‍हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपीबाबत पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले,अप्‍पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके,उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड,पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.अनिल मोरे,तसलीम पठाण,पोना.रमण सुरळकर, उमाकांत पाटील,महेश चौधरी, तुषार पाटील,समाधान पाटील, पोकाॅ.विकास सातदिवे,ईश्वर भालेराव,प्रशांत परदेशी यांच्‍या पथकाने भु-या बारसे रा. वाल्मिकी नगर,किशोर उर्फ सुधाकर टोके रा.गांधीनगर(संजय अावटे यांच्‍या वाहनावरील चालक) व अनिल किशोर डागोर रा.वाल्मीक नगर या तिघांना सापळा रचुन वाल्मिक नगर भागातून ताब्यात घेतले आहे.

Unlimited Reseller Hosting