Home बुलडाणा सामाजिक कार्यकर्ता बुद्धु चौधरी चा सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते सन्मान

सामाजिक कार्यकर्ता बुद्धु चौधरी चा सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते सन्मान

360

अमीन शाह

सिंदखेडराजा येथील बुध्दू चौधरी नावाचा कार्यकर्ता सिंदखेडराजा तालूक्यासह परीसरात सर्वांच्या परीचीत असलेला हक्काचा माणुस.बुद्धू चौधरी यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास नागपुर – मुंबई हायवेवर सिंदखेडराजा दरम्यान अपघात
झाल्यास अपघातावेळी बघणारे सुद्धा बुद्धु ला फोन लावतात आणी अपघात झाल्याचे सांगतात.याचवेळी क्षणाचाही विलंब न करता राञ असो वा दिवस घड्याळाकडे न बघता बुद्धु नावाची १०८ अबुलन्स अपघात स्थळी धाव घेते आणी अपघात ग्रस्ताना सिंदखेडराजा येथील शासकीय रुग्णालयात भरती करुन ऊपचार करे पर्यत थांबुन नातेवाईकांना निरोप देणे याचबरोबर रुग्ण जास्त च सिरीयस असेल तर जालना पाठवने असा बुद्धु चौधरी या
युवकाचा सामाजिक सवेंदनशीलपणा सर्वांना परीचीत आहे.बुद्धु चौधरी यांच्या कामाची दखल सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरानी घेत त्यांचा अनेकांनी सन्मानपण केला आहे.परंतु दिनांक २० फेब्रुवारी रोजी वाघाळाषया ठिकाणी महाशिवराञी महोत्सवात अनाथांची माय सिंधुताई सपकाळ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते या धडपड्या कार्यकर्ता बुद्धु चौधरी यांचा सत्कार करुन आयोजकांनी चौधरी यांच्या कामाचा सन्मानच नाही तर ऊभारी देण्याच काम केले आहे.