Home मराठवाडा कोट्यवधींचा अपहार ,वन क्षेत्रपाल अखेर निलंबित…!!

कोट्यवधींचा अपहार ,वन क्षेत्रपाल अखेर निलंबित…!!

54
0

सय्यद नजाकत

जालना , दि. २१ :- बदनापूर तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाने वनिकरणाच्या नावाखाली वनीकरण न करता बोगस देयके अदा करून घोटाळा केल्याची तक्रार झाल्यानंतर चौकशीत तथ्य आढळल्याने वन क्षेत्रपाल एस एम रावल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याने खळबळ माजली असून सखोल चौकशी झाल्यास अनेक प्रकरणे उजेळात येण्याची शक्यता आहे

बदनापुर तालुक्यात सामाजिक वनीकरणच्या नावाखाली करोडो रुपयांचा आपहार होत असल्याबबत नीलेश गोर्डे यांनी २० मार्च २०१८ रोजी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. याबाबत सबंधित विभागाकडून अनेक वेळा तक्रारदार व गैर तक्रारदार याची सुनावनी घेण्यात आली. यामधे वृक्ष लागवड न करता करोडो रुपयचे बिल उचलणे, खेड़े गावात दुतर्फा वक्ष लागवड कागदोपत्रीच, ज्या व्यक्तीच्या नावे पैसे उचलण्यात आली त्यातील बहुतांश मंडळी अस्तितवातच नाहीत, बाहेर गावी शाळेत शिकणाऱ्या मुलाच्या नावे कामावर असल्याचे खोटे पुरावे देऊन पैसे उचलणे आदि चौकशीची मागणी वेळोवेळी नीलेश गोर्डे यांनी मा जिल्हाधिकर्याकडे केली व या तक्रारीचा कायम पाठपुरावा केल्यामुळे सबंधित विभागाने या अधिकाऱ्यांच्या कामाची माहिती घेऊन हा वृक्ष लागवड कार्यक्रम बोगस असल्याबबत खात्री करुण सबंधित अधिकाऱ्यावर मा विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी 27/08/2018रोजी निलंबन कार्यवाही करुण मा तक्रार निवारण प्राधिकारी मग्रारोहिओ जालना यांनी हे प्रकरण 27/01/2020 रोजी निकाली काढल्याचे सांगितले

सामाजिक वनीकरण विभागामार्फत दरवर्षी वनिकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी संबंधित विभागाला मिळतो परंतु अनेक ठिकाणी खंडडे खणल्याचे व झाडांची लागवड केल्याचे कागदोपत्री दाखवून काही अधिकारी बोगस बिले उचलतात असाच प्रकार बदनापूर तालुक्यात घडलेला असल्याने सदर कारवाई चौकशीअंती करण्यात आली आहे ,या कार्यवाही मुले सामाजिक वनीकरण खात्यातील अनेक अधिकाऱ्याने धसका घेतला असून बदनापुर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात असाच बोगस कागदोपत्री वृक्ष लागवड प्रकार असू शकतो असा प्रश्न या कार्यवाही नंतर नीलेश गोर्डे यांनी उपस्थित केला आहे

Unlimited Reseller Hosting