Home विदर्भ गावंडे महाविद्यालयाच्या आत्मदर्पण अनियतकाचे रविवारी प्रकाशन , “पत्रकारांचाही होणार सम्मान”

गावंडे महाविद्यालयाच्या आत्मदर्पण अनियतकाचे रविवारी प्रकाशन , “पत्रकारांचाही होणार सम्मान”

118

यवतमाळ / उमरखेड , दि. २१ :- येथील गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालया अंतर्गत चालणाऱ्या जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी संपादीत केलेले ‘ आत्मदर्पण ‘ या अनियतकालीकाचे रविवार ( ता. २३ ) रोजी प्रकाशन होणार आहे .
महाविद्यालयाच्या म्युजीयम सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात तालूक्यातील विविध वृत्तपत्रात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांचा देखील सम्मान होणार आहे .
यवतमाळ जिल्हा अखील कुणबी समाज संस्थेचे सचीव डॉ . या . मा . राऊत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या अमरावती विभागाचे संचालक प्रा .डॉ . अंबादास मोहिते हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असतील तर यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून यवतमाळ श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप खडेकर ( यवतमाळ ) तसेच जील्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांची उपस्थिती राहणार आहे . या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य एस .आर. वद्राबादे, केन्द्र सहसंयोजक प्रा .बी.यू. लाभशेटवार यांनी केले आहे .