Home विदर्भ पी.एम.वाकपांजर व एम.एन अढाऊ या दोन तलाठ्याची वेतनवाढ रोखली

पी.एम.वाकपांजर व एम.एन अढाऊ या दोन तलाठ्याची वेतनवाढ रोखली

130

देवानंद खिरकर – अकोट

अकोला , दि. २१ :- हिवरखेड येथिल दोन्ही तलाठीवर लाच घेतल्याचा आरोप होता.या प्रकरणी दोन्ही तलाठी यांना कारणे दाखवा नोटीस बजावत लेखी स्पष्टीकरण मागविले होते.लेखी स्पष्टीकरण संयुक्तीत वाटत नसल्याने तहसीलदार सुरडकर यांनी दोन्ही तल्याठ्यांची कायम प्रभावाने एक वेतनवाढ रोखण्याचा कार्यालयीन आदेश काढला बदलीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांचेकडे पाठविला आहे.
काही दिवसापुर्वी हिवरखेड येथिल प्रहारच्या कार्यकर्त्यांनि रवि घुंगडच्या नेतृत्वात हिवरखेड येथिल भाग एकचे तलाठी पी.एम.वाकपांजर व हिवरखेड दोनचे तलाठी एम.एन.अढाऊ यांच्या कार्यालयात शासनामार्फत मोफत असलेल्या दाखल्याचे नागरीकाकडुन पैसे वसुल करून लाच घेत असल्याचा आरोप करीत झालेल्या विवादाचे व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित केले होते.या दोन तलाठ्यावर लाच खोरीचा आरोप करून त्यांच्यावर कारवाई ची मागणी लावुन धरली होती.त्या नंतर या प्रकरणी मंडळ अधिकारी वडाळ यांनी अनेक नागरिकांचे लेखी बयाण घेतले होते.या बयाणामधे विसंगती दिसत आहे.काही नागरीकांनि हे तलाठी पैसे घेत असल्याचे बयाण दिले तर काहींनी तलाठ्यांनी पैसे घेतले नसल्याचे बयाण दिले आहे.नंतर तहसीलदार यांनी तलाठ्यांना कारणे दाखवा नोटिस देत दोन दिवसात लेखी स्पष्टीकरण मागितले होते.तलाठ्यांनी दिलेले स्पस्टीकरण संयुक्तीत वाटत नसल्याचे तहसीलदार यांना दिसुन आले.त्यामुळे तहसीलदार सुरडकर यांनी पुढिल वेतनवाढीवर परिणाम न होता दोन्ही तल्याठ्याची कायम प्रभावाने एक महिन्याची वेतन वाढ रोखण्याचा कार्यालयीन आदेश काढला.तलाठ्यांचे बदलीचा प्रस्ताव सुध्दा उपविभागीय अधिकारी रामदास सिध्दभट्टि यांचेकडे पाठवला आहे.तलाठी पी.एम.वाकपांजर यांची या आधी असलेली बोर्डी,अकोली जहागिर,हिवरखेड या तिनही गावातील कारकिर्द ही अतिशय वादग्रस्त ठरली आहे. या तिनही गावामधुन तलाठी वाकपांजर यांच्या बाबत वरिस्ठान कडे लेखि तक्रारी व पेपरबाजी झालेल्या आहेत.त्यामुळे वरिस्ठ अधिकारी यांनी लक्ष देवून अशा तलाठ्यावर कारवाई करने गरजेचे आहे.

प्रतिक्रिया – दोन्ही तलाठ्यांची एक वेतनवाढ रोखली असुन त्यांच्या बदलीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांचेकडे पाठविला आहे.नागरीकाच्या सुविधेसाठी लवकरच हिवरखेड येथे कर्त्यव्यतत्पर तलाठी नियुक्त करु.
राजेश सुरडकर तहसीलदार तेल्हारा.

प्रतिक्रिया – ज्या तलाठ्याचे पदावनती व्हायला पाहिजे त्यांची पदोन्नति होत आहे.हा गंभीर प्रकार पालकमंत्री साहेबांच्या निर्दशनास आणून त्या तलाठ्याची पदोन्नति रद्द करण्याची विनंती करु.
रवि घुंगड प्रहार जनशक्ती पक्ष हिवरखेड