Home आध्यात्मिक देगलूरमध्ये वै. सद्गुरु एकनाथमहाराज देगलूरकर पुण्यस्मरण उत्सवास भाविक भक्तांची मोठी गर्दी….!!

देगलूरमध्ये वै. सद्गुरु एकनाथमहाराज देगलूरकर पुण्यस्मरण उत्सवास भाविक भक्तांची मोठी गर्दी….!!

190

नांदेड , दि. १९ :- ( राजेश भांगे ) देगलूर शहरात दि. १६-०२-2020 रोजी पासून देगलूर येथे वै. सद्गुरु एकनाथमहाराज देगलूरकर पुण्यस्मरण उत्सवास सुरुवात झाली आहे. देगलूर येथे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी वै. सद्गुरु एकनाथमहाराज देगलूरकर पुण्यस्मरण सोहळयास सुरवात झाली आहे. तरी या पुण्यस्मरण सोहळा धार्मिक कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असुन.सकाळी 6 ते 9 श्री ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 10 ते 12 तुकाराम गाथा भजन, दुपारी 4 ते 5 श्री ज्ञानेश्वरी प्रवचन, साय. 7 ते 8 श्री चक्रीभजन, रात्री 9 ते 11 श्रीहरीकीर्तन.. पुढीलप्रमाणे
दि. 16/2/2020 ह.भ.प. श्री कालिदास महाराज पाळेकर, 17/2/2020 ह.भ.प. श्रीकृष्णामहाराज बनवसकर, 18/2/2020 ह.भ.प. श्रीविनोदमहाराज जाधव, 19/2/220 ह.भ.प. श्री भालचंद्र सरदेशपांडे, 20/2/220 ह.भ.प. श्रीजयेश महाराज भाग्यवंत, 21/2/220 ह.भ.प. श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर, 22/2/2020 श्री शरदचंद्र महाराज देगलूरकर, दि. 23/2/2020 श्री चंद्रशेकर महाराज देगलूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त रोज महाप्रसादाचे आयोजन केले आहे. स्थळ – सद्गुरू श्री गुंडामहाराज मठ संस्थान, देगलूर.