Home विदर्भ नारी रक्षा समितीच्या वतिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

नारी रक्षा समितीच्या वतिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

158

यवतमाळ , दि. १९ :- येथील गार्डन रोडवरिल शिवतीर्थ याठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ असलेल्या पुतळ्याला माल्यार्पन करुन नारी रक्षा समितीच्या वतिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले,या वेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले कि,छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा का म्हणावे कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक असे असाधारण व्यक्तिमत्व होते जे पुन्हा कधीच जन्मास येणार नाही आणि तसे कोणी होणार सुद्धा नाही.

छत्रपती शिवाजीराजे हे केवळ राजेच नव्हते तर ते तमाम रयतेचे मायबाप होते,आया बहिणींचे रक्षणकर्ते होते,मराठी मुलुखाचे सर्वतोपरी हित जपणारे होते, शेतकऱ्यांचे बळीराजा होते, सर्व धर्माचे रक्षणकर्ते व आदर करणारे होते, रयतेच्या धनसंपत्तीचे रक्षणकर्ते होते, अन्यायाचे कर्दनकाळ होते, आईच्या शब्दाचे पालन करणारे होते.त्यांच्यात स्वराज्याची जिद्द होती आणि त्यांनी ते स्वबळावर उभारले. सह्याद्रीच्या कुशीतले गड-कोटांचे सर्व जातीजमातींना सन्मानाने वागणूक देऊन त्यांनी तळागाळातील सर्व जाती जमातीच्या युवकांना स्वराज्याचे शिलेदार बनवले.आपला मराठी मुलुख वाचला तर सर्व काही वाचेल या विचारांनी गडकिल्ल्यांची निर्मिती आणि संवर्धन करणारे ते होते,भविष्यातील संभाव्य धोका ओळखून वेळीच त्याची उपाययोजना करणारे ते दूरदृष्टीचे प्रतीक होते,अफाट मुघल सैन्यासमोर निधड्या छातीने स्वराज्याची सिंहगजर्ना करणारे ते होते.म्हणूनच तर त्यांना जाणता राजा म्हणून सर्व विश्वात संबोधले गेले.या प्रसंगी नारी रक्षा समितीचे मनिषाताई तिरणकर,दुर्गाताई पटले,विनोद दोंदल,सुकांत वंजारी,पुष्पाताई जाधव,मंदाताई गुडदे,रश्मीताई तोंदवाल,सुवर्णाताई गायकवाड,सुनंदा मडावी,काश्यपी दोंदल,वाहुल दोंदल इत्यादी सदस्य उपस्थित होते.