Home सोलापुर सांगवी बु येथे शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न.

सांगवी बु येथे शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न.

59
0

वागदरी / नागप्पा आष्टगी

अक्कलकोट तालुक्यातील सांगवी येथे शिव जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील सर्व धर्मिय शिवभक्त रक्तदान शिबीरात हजेरी लावली .८० जणानी रक्तदान केले.

यावेळी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच अबूबकर शेख व विष्णू देवकर, यांच्या हस्ते झाला. त्या नंतर शाळा, हायस्कूल, ग्रामपंचायत येथे शिवाजी महाराजाची जयंती साजरी करून या रक्तदानास सुरुवात करण्यात आली. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे सांगवी गावात पाहिल्यांदाच रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते, दरम्यान गावातील ८० रक्तदात्यानी रक्तदान केले असून, त्यात बचतगटाच्या महिलांचा ही सहभाग होता.
या रक्तदान शिबिराचे आयोजन संयोजक शिव क्षत्रपती तरुण मंडलाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप सलबत्ते, अध्यक्ष आकाश घबले, उपाध्यक्ष नागेश शहापुरे, आकाश भोसले, यांनी केले होते. रक्ताचे संकलन मेडिकेअर ब्लड बँक सोलापूर यांनी केले. या शिवजयंती व रक्तदान शिबिराकरिता मेजर बाळासाहेब भोसले, पत्रकार प्रविणकुमार बाबर, तानाजी भोसले, अक्षय घाटगे, राम आवटे, अभिजित माने, यतीराज भोसले, अंबादास बताळे, नारायण भोसले, गोपीनाथ माने, लक्ष्मण यादव, अतुल घबले, रोहित घाटगे, राम माने, संदीप सलबत्ते, सूरज भोसले, यासह मंडळाचे कार्यकर्ते अथक परिश्रम घेतले.
यावेळी, ग्रामसेवक ए बी ताड, पोलीस पाटील शुभांगी बाबर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण घाटगे, इरफान शेख, बाळू भोसले, राजू ढेंगळे, आलम मुल्ला, मुना शेख, भास्कर सर, शॅलोद्दीन शेख, दादा भोसले, शिवाजी भोसले, गणेश भोसले, एकनाथ भोसले, सूरज भोसले, रोहन रेड्डी, सुनील भोसले, परशु रेड्डी, हनिफ शेख, याच्यासह गावातील तमाम नागरिक उपस्थित होते