Home मराठवाडा नांदेडच्या स्था. गु .शा . पथकाने केले गांडुळ विक्रेत्यांना जेरबंद

नांदेडच्या स्था. गु .शा . पथकाने केले गांडुळ विक्रेत्यांना जेरबंद

52
0

नांदेड , दि. १९ :- ( राजेश भांगे ) नांदेड येथे गांडूळ विक्री करणाऱ्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी अटक केली. त्यांच्याकडून साडेचार लाखाचे तीन मांडूळ जप्त केले.

ही कारवाई आसना नदी परिसरात असलेल्या एका गुरूद्वाराजवळ मंगळवारी (ता. १८) दुपारी केली. घटनास्थळावरून पोलिस दिसताच दोघेजण पसार झाले. याप्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मांडूळ ही सापाची जात असून ती गुप्तधन व पैशाचा पाऊस पाडण्याचे काही मोठे श्रीमंत व्यक्ती विकत घेत असतात. त्या व्यक्तींना ही टोळी आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखोंची माया जमा करतात. एक मांडूळ कमीतकमी एक लाखाच्यावर विक्री केल्या जाते. ही टोळी अर्धापूर व नांदेड शहरात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळाली. त्यांनी अधीकृत माहिती घेऊन पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांना सांगितले.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. चिखलीकर यांनी सहय्यक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्या पथकाला गुप्त माहितीवरून सापळा लावण्याचे सांगितले. श्री. मांजरमकर यांनी मंगळवारी (ता. १८) आसना बायपास परिसरात असलेल्या गुरुद्वाराजवळ सापळा लावला. यावेळी मांडूळ विक्री करण्यासाठी आलेल्या चार मांडूळ तस्करांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन मांडूळ जप्त केले. यात एकाचे वजन सव्वादोन किलो, दुसरा एक किलो ९०० ग्राम आणि तिसरा एक किलो असे मांडूळ जप्त केले. या मांडूळाची किंमत अंदाजे बाजारात साडेचार लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली.