Home बुलडाणा राज्यपाल व कृषीमंत्री दादाजी भुसे यांचा कार्यकारी परीषद सदस्य विनायक सरनाईक यांच्या...

राज्यपाल व कृषीमंत्री दादाजी भुसे यांचा कार्यकारी परीषद सदस्य विनायक सरनाईक यांच्या हस्ते सत्कार…

721

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ३४वा दीक्षांत समारंभ संपन्न…

प्रा. तनज़ीम हुसैन

चिखली , दि. ०७ :- डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३४वा दीक्षांत समारंभ दि५फेब्रुवारी रोजी १०वाजता दीक्षांत सभागृहात आयोजीत करण्यात आला होता.दरम्याण या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणुन असलेले मा.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व कृषीमंत्री दादाजी भुसे यांचा सत्कार पंदेकृवि चे कार्यकारी परीषद सदस्य विनायक सरनाईक,गणेश कंडारकर,मोरेश्वर वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आला.

पंदेकृवि अकोला येथे ३४वा दीक्षांत समारंभ राज्यपाल व कृषी मंत्री यांच्या प्रमुख उपस्थीतीत संपन्न झाला या सोहळ्यात कृषी पदवीच्या २६४०,पदव्युत्तर विद्याशाखेच्या ४२८अशा एकुण ३०६८विद्यार्थी उतीर्ण झाले असुन,यापैकी २२११विद्यार्थ्यांनी स्वत:उपस्थीत राहुण पदवी स्विकारली तर अनेकांना रौप्य व रोख पुरस्कार वितरीत करण्यात आले.

त्याचप्रमाणे उत्कृष्ठ संशोधक शिक्षक व कर्मचार्याना १४पदके देण्यात आली व यावर्षी प्रथमच ५०जणांनी अभ्यासक्रम पुर्ण केला त्यांना आचार्य (पी एच डी) पदवी पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली.दरम्याण या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थीत असलेले मा.राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी,व कृषीमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा ना दादाजी भुसे यांचा सत्कार अकोला कृषी महाविद्यालयात डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यकारी परीषद सदस्य विनायक सरनाईक,गणेश कंडारकर,मोरेश्वर वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कुलुगुरु डॉ विलास भाले,कुलसचिव डॉ प्रकाश कडु,विद्यापीठाचे कृषी अधिष्ठाता डॉ प्रदिप इंगोले,संशोधन संचालक डॉ खर्चे,शिक्षण विस्तार संचालक डॉ दिलीप मानकर,कृषी अभियांत्रीकी अधिष्ठाता डॉ नागदेवे,डॉ काळे यांच्यासह आदिची उपस्थीती होती.