Home बुलडाणा जन्मदात्या आई-वडीलानीच केली पुत्राची हत्या..!

जन्मदात्या आई-वडीलानीच केली पुत्राची हत्या..!

314
0

अमीन शाह

बुलडाणा , दि. ०७ :- लग्नानंतर आपल्या संतान व्हावी ही इच्छा प्रत्येक जोडप्याची असती. आपल्या लेकरु साठी आई-वडील अनेक कष्ट करून त्यांना मोठा करतात परंतु अशी एक घटना समोर आली की जन्मदात्या आई-वडीलानेच आपल्या 25 वर्षीय पुत्राची हत्या केली पण एका 3 वर्षीय बालिकेच्या साक्षीने त्यांचा हा क्रूर कृत्य समोर आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुका अंतर्गतच्या जामोद गावाला लागून असलेल्या लोनखेड शिवारात काही आदिवासी कुटुंब राहतात.यामध्ये 25 वर्षीय मृतक रामभाऊ व त्याचे आई-वडील राहत होते. दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान काही शुल्लक कारणावरून मृतक रामभाऊ व त्याचे आई-वडील यांच्यात वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. वडील व मुलगा दारूच्या नशेत असल्याने राग अनावर होऊन वडिलांनी रामभाऊच्या डोक्यात कुदळीने वार केला व आई सुगराबाई हिने ठिबकच्या नळीने रामभाऊला फाशी देऊन त्याची जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव व त्यांची टीम घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून खुनाचा शोध घेतला असता आरोपींच्या घरात राहणारी त्यांच्या नातेवाईकाची 3 वर्षीय मुलगी पार्वती हिने खुनाचा उलगडा पोलिसांसमोर केल्याने पोलिसांना आरोपी अटक करण्यास मदत झाली. या हत्ये मागचा कारण असा समोर आला की मृतक मुलगा दारूच्या आहारी गेला होता व आपल्या आई वडिलांना नेहमी दारूसाठी पैशयाची मागणी करायचा.सद्या आई वडील 8 फेब्रूवारी पर्यंत पोलिस कोठडित असून पुढील तपास पोलिस करीत आहे.