Home जळगाव मुस्लिम मंच चे ४२ व्या दिवशी उपोषण सुरूच…!!

मुस्लिम मंच चे ४२ व्या दिवशी उपोषण सुरूच…!!

296

खान अब्दुल गफार खान यांना मानवंदना

रावेर (शरीफ शेख)

जळगाव मुस्लिम मंच तर्फे भारतीय राष्ट्रीय नागरिकत्व सुधारित कायदा, एन आर सी व एन पी आर ला विरोध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर सुरू असलेल्या उपोषणाचा शुक्रवार बेचाळीसावा दिवस जळगाव शहरातील विविध संघटना, उलमा व आलीम यांच्या सक्रिय सहभागाने विरोध नोंदविण्यात आला.

तत्पूर्वी भारताचे खान अब्दुल गफार खान यांची सहा ऑगस्ट ही जयंती असल्याने त्यांच्या कार्याला उजाळा देणाऱ्या गोष्टी मंचचे समन्वयक फारुक शेख यांनी विशद केल्या डॉक्टर करीम सालार यांनीसुद्धा त्यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक नोंदी स्पष्ट करून त्यांनी भारतासाठी केलेल्या कार्याचा आलेख तरुणांसोबत शेअर केला.

उपोषणाच्या वेळी अक्सा मस्जिद चे मौलाना सालिक सलमान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अश्फाक पिंजारी, मुस्लीम कॉलनी मशीदचे इमाम हाफिज शहीद, कादरिया फाऊंडेशनचे फारूक कादरी, बंगाली असोसिएशनचे शमीम हलदर, आदींनी मार्गदर्शन केले.
*यांची होती विशेष उपस्थीती*
राष्ट्रवादीचे गफ्फार मलिक, इकराचे प्राध्यापक डॉक्टर इक्बाल शहा, मन्यार बिरादरीचे हसन मणियार ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सय्यद शाहिद, एम आय एम विद्यार्थी संघटनेचे समीर सय्यद, पुरोगामी चळवळीचे तरुण अल्फाज पटेल, भुसावळचे इम्तियाज शेख, रावेरचे जाकिर सय्यद, सावदयाचे अय्यूब शेख ,यांची विशेष उपस्थिती लाभली.

*अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन*

मिलत हायस्कूलचे माजी उपमुख्याध्यापक लइक शेख यांच्या नेतृत्वात अप्पर जिल्हाधिकारी बेडसे यांना निवेदन देण्यात आले त्यावेळेस फारुक शेख, खलील अहमद, अल्ताफ शेख ,अन्वर सिकलिगर, अफजल पठाण, शमीम हलदार, ताहेर शेख व अकबर शेख यांची उपस्थिती होती.