जळगाव

वाघोड  येथे अवैद्य दारु विक्री टपरी जळीत प्रकरणी महिलांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावे

Advertisements

तालुका शिवसेना युवासेने तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा

रावेर (शरीफ शेख)

तालुक्यातील वाघोड येथे अवैद्य दारु विक्री टपरी जळीत प्रकरणी गावातील महिलांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरीत मागे घ्यावे अन्यथा दि. १३ रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा तालुका शिवसेना युवासेने तर्फे दिलेल्या निवेदनान्वये देण्यात आलेला आहे.
युवासेना जिल्हा युवाधिकारी अविनाश पाटील, शिवसेना जिल्हा उप संघटक रविंद्र पवार, तालुका युवाधिकारी प्रवीण पंडीत यांचे नेतृत्वाखाली आज पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना या बाबत निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील वाघोड येथे २०१३ मध्ये बाटली आडवी होवुन गावात दारु बंदी झालेली असतांना गावात काही टप-यां मध्ये सर्रास अवैद्य रित्या दारुची विक्री सुरच होती. या बाबत गावातील नागरीक, महिला यांनी वेळोवेळी पोलिसांकडे तक्रार करुन या अवैद्य दारुची विक्री त्वरित बंद करण्याची मागणी करुनही गावात दारुची सर्रासपणे विक्री सुरुच होती दारु मुळे गावातील गोरगरीबांचे संसार उध्वस्त होत होते. वारंवार तक्रारी करुनही दारु विक्री सर्रासपणे सुरुच राहिल्याने या मुळे त्रस्त नागरिकांच्या संयमाचा अंत होवुन गावातील अवैद्य दारु विक्री टपरी जळीत प्रकरण घडले. या प्रकरणी पोलिसांनी गावातील पुरुषां बरोबरच काही महीलांवरही गुन्हे दाखल केल्याने गावक-यां मधुन तिव्र संताप व्यक्त होत आहे. असे निवेदनात नमुद करुन वाघोड येथील महिला व पुरुषांवर दाखल केलेला गुन्हाय त्वरीत मागे घेण्यात यावा, तालुक्यात सुरु असलेले अवैद्य धंदे त्वरीत बंद करावेत अशा मागण्या निवेदनत करण्यात आलेल्या असुन अन्यथा दि. १३ फेब्रुवारी रोजी शिवसेना,युवासेने तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा ही या निवेदनान्वये देण्यात आला आहे.

या प्रसंगी तालुका संघटक अशोक शिंदे , शहर युवाधिकारी राकेश घोरपडे, संजय पाटील सचिन पाटील, कमलेश पाटील, दिनेश महाजन, शे.लतीफ यांचे सह मोठ्या संख्येने शिवसेना युवासेना पदाधिकारी व मोठया संख्येने शिवसैनिक व युवासैनिकांनी उपस्थित.

You may also like

जळगाव

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी केली जम्बो कार्यकारिणी जाहीर… आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप…

अमळनेर  –  येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी आमदार अनिल ...
जळगाव

ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहुउद्देशिय सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या संकल्पित बहुउद्देशिय सभागृहाच्या ...
जळगाव

आरटीई नुसार झालेल्या प्रवेशप्रक्रियेच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वावडदा येथील पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले निवेदन रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश ...