विदर्भ

गोदावरी अर्बनचा सलग चौथ्यांदा बँको पुरस्काराने सन्मान , “अर्थ साक्षर उपक्रमांची केली प्रशंसा”

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

गोवा / यवतमाळ , दि. ०८ :- बँकिंग क्षेत्रातील महत्वाचा समाजाला जाणारा बँको पुरस्काराने सलग चौथ्या वेळी गोदावरी अर्बन पतसंस्थेला गोवा येथे झालेल्या बँको अडव्हान्टेज सहकार परिषद २०२० मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला. सोबतच गोदावरी अर्बन च्या सामाजिक उपक्रमांची प्रशंसा करण्यात आली हा पुरस्कार गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांना प्रदान करण्यात आला.
सहकार क्षेत्राला बळकटी देणाऱ्या सहकारी संस्थाना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने बँको कोल्हापूर आणि गॅलेक्सी इनमा यांच्यावतीने सहकारी पतसंस्थांसाठी बँको अडव्हान्टेज सहकार परिषद २०२० व बँको ब्लू रिबन प्रदान संभारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बँकिंग क्षेत्रातील अनेक विषयावर तज्ञ मंडळींनी मार्गदर्शन केले. २०१९ चा बँको पुरस्कार गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप पतसंस्थेला सलग चौथ्या वेळा प्रदान करण्यात आला. सहकार क्षेत्रातील सतत बदलणाऱ्या परिस्थितीत व्यवसाय करणे आणि तो वाढविणे हे पतसंस्थांसाठी फार मोठे आव्हान आहे. ग्राहकांचा विश्वास संपादन करून नवनवीन प्रवाहांची ओळख करून घेणे व त्याचा बँकिंग क्षेत्रात उपयोग करणे, हे कार्य गोदावरी अर्बनने केले आहे, असे गौरव उदगार काढण्यात आले , गोदावरी अर्बनला यापूर्वी प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार,सहयाद्री उद्योग समूहाचा अर्थरत्न पुरस्कार,आदर्श नारीरत्न पुरस्कार,बेस्ट चेअरमन राष्ट्रीय पुरस्कार,सहकार शक्ती पुरस्कार,यासह आदी पुरस्कार मिळाले आहेत. संस्थेच्या अध्यक्ष राजश्री पाटील म्हणाले की संस्थापक अध्यक्ष हेमंत पाटील यांचे मागर्दर्श व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातून गोदावरी अर्बन अनेक पुरस्काराची मानकरी ठरत आहेत.सोबतच गोदावरी वर विश्वास ठेवून व्यवहार करणाऱ्या असंख्य ग्राहकांचे आम्ही ऋणी आहोत .

गोदावरी अर्बन, बँकिंग क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवत असताना सामाजिक कार्यात अग्रेसर राहून कार्य करते, रक्तदान, वृक्षारोपण, पोलिस स्टेशनला बॅरिकेट, रुग्णालयाला शीत शवपेटी, गोदावरी नदी स्वच्छता अभियान, महिला सक्षमी करणासाठी महिलांना रजई, प्रशिक्षण, शिलाई मशीनचे वाटप, पर्यावरण जनजागृती, उपक्रम राबवून सामाजिक भान जपत आहे.
या प्रसंगी मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे, लेखापाल विजय शिरमेवार, सीबीएम पी.व्ही.किशोर, एम.नागाबाबू, पी.रामलू, शाखा व्यवस्थापक ए.कैलाशपती, सुंका शिवकुमार, नंदी किशोर, टी.प्रदीप, एन.श्रीहर्षा, प्रभारी शाखाधिकारी बी.श्रीकांत, अमित पिंपळकर, कनिष्ठ सहाय्यक अधिकारी सौ.दीपाली वानखेडे, चेतन पटेलीया, सुमित देवरे, आकाश चोले, गोपाळ जाधव उपस्थित होते.

You may also like

विदर्भ

नाश्त्याच्या चिल्लर पैशाच्या वादातून आदिवासी युवकाला मारहाण , “येळाबारा येथील घटना”

यवतमाळ / घाटंजी (तालुका प्रतिनिधी) – येथून 12 किमी अंतरावर असलेल्या येळाबारा येथे चिल्लर पैशाच्या ...
विदर्भ

राष्ट्रिय चर्मकार महासंघाच्यावतीने तहसिलदार भगवंत कांबळे यांचा सत्कार,  ‘उपजिल्हाधिकारी पदी बढती,राज्यभरातून अभिनंदन”

धामनगाव रेल्वे – प्रशांत नाईक अमरावती – जिल्ह्यातील धामनगाव रेल्वे तहसिलचे कर्तव्यदक्ष,समाजभुषन तहसिलदार भगवत पांडूरंग ...
विदर्भ

यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार आरोग्य विभागाने केली ,  “उलट जिल्हातीलचं जनता जिल्हाधिकारी साहेबांच्या मदतीला धावुन आली….!”

कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी का झाले आरोग्य विभागाला डोईजड ?? नरेन्द्र कोवे यवतमाळ – जगभरात करोना विषाणूजन्य ...

कोरपणा येथे युवा प्रतिष्ठान द्वारा संचालीत युवा फिटनेस कल्ब चा लोकार्पण सोहळा संपन्न

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे कोरपणा येथे मागील वर्षा पासुन युवकांच्या समस्या सोडण्यासाठी समाजसेवेचे कार्य करण्याकरीता ...
विदर्भ

यवतमाळ जिल्हातील पारवा ठाणेदाराकडून आदिवासी इसमाला जातीवाचक शिवा देत मारहाण

ठाणेदाऱ्यांच्या विरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल यवतमाळ / घाटंजी – तालुक्यातील पारवा पोलीस ...
विदर्भ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने स्विकारली सर्व अंत्यसंस्काराची जबाबदारी…..

कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मोफत पी पी ई किट….मनसे समाजातील सरसावली आर्थिक दुर्बल घटकांसाठी ...
विदर्भ

पुसद येथे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यां करिता पोलिस भर्ती पूर्व प्रशिक्षण विशेष कार्यशाळा संपन्न

यवतमाळ / पुसद –  राज्यात अल्पसंख्याक समाजाचे पोलिस सेवेतील प्रमाण वाढावे याकरीता पुसद जिल्हा यवतमाळ ...