Home बुलडाणा भाजपा नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज ,

भाजपा नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज ,

29

 

बुलडाणा जिल्ह्यात उडाली खळबळ ,

 

शिंदे सेनेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर भरला उमैदवारी अर्ज ,

अमीन शाह ,

बुलडाणा : राज्यपातळीवर
महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित दिसत
असली तरी बुलडाणा जिल्ह्यात मात्र अंतर्गत धुसफूस
कायम आहे. काल हर्षवर्धन सपकाळ यांनी मैत्रीपूर्ण
लढतीचा बॉम्बगोळा टाकल्याने महाविकास आघाडीतील
राजकीय वातावरण गरम असताना आता महायुतीतील
अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. बुलडाणा
लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला न सुटल्याने
नाराज असलेले माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आज दुपारी भाजपा कार्यकर्त्यांसह आपला उमेदवारी अर्ज दाखल
केला आहे

भाजपचे मतदार आपल्यासोबत असल्याचा दावा विजयराज शिंदे
यांनी केला आहे. अर्ज भरण्याआधी माध्यमांशी त्यांनी बोलतांना म्हटले की, भाजपच्या वतीने मतदारांच्या वतीने
मी अर्ज भरत आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघ
भाजपला सुटावा, या मतदारसंघात कमळ चिन्हाचा
उमेदवार असावा ही कार्यकर्त्यांची सुप्त भावना आहे. या
भावनेला वाट मोकळी करून देत असल्याचे ते म्हणाले.