Home बुलडाणा बुलडाणा जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे सह कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंगाचा पहिला...

बुलडाणा जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे सह कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल ,

27

 

अमीन शाह

बुलडाणा – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाची बँक खाते गोठवून त्यामधील रक्कम वळती करण्यात आली व काँग्रेसला 18 शे कोटीपेक्षा अधिक रकमेचा दंड करण्यात आला, या घटनेचा निषेध करत 31 मार्चला दुपारी बुलढाणा येथील जयस्तंभ चौकात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने करत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे, आंदोलन, निदर्शने यावर 6 जुने पर्यंत निर्बंध असतांना देखील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जस्तम चौकात रस्त्यावर येऊन निदर्शने करत घोषणाबाजी केली व शासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याने पोलीस कॉन्स्टेबल उमेश घुबे यांच्या तक्रारीवर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, शहर अध्यक्ष दत्ता काकस, लक्ष्मण घुमरे, संतोष आंबेकर, प्रकाश पाटील, समाधान सुपेकर, बाळाभाऊ भोंडे, मंगला पाटील, सय्यद इरफान, एकनाथ चव्हाण व इतर 10 ते 15 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.