Home उत्तर महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यातील आधार कार्ड सेंटर संख्या सह सुख दुरुस्ती नियम शिथिल करणे...

जळगाव जिल्ह्यातील आधार कार्ड सेंटर संख्या सह सुख दुरुस्ती नियम शिथिल करणे बाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

90
0

रावेर – शरीफ शेख

रोशनी एज्युकेशन अँड मल्टीपर्पज सोसायटी जळगाव यांच्यामार्फत उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांची समक्ष भेट घेऊन त्यांना एक निवेदन देण्यात आले त्यात जिल्ह्यातील आधार कार्ड सेंटर संख्या वाढवणे, पायलट बेसिस वर नवीन आधार कार्ड सेंटर सुरू करणे ,आधार कार्डच्या चूक दुरुस्ती नियमात दुरुस्तीसाठी पाच वेळेचे प्रवाधन करणे ,फक्त तहसीलदार च्या सही शिक्क्याने प्रतिज्ञापत्रावर चूक दुरुस्त करून देण्यास मान्यता देणे त्यात प्रामुख्याने नाव व जन्मतारीख यांचा समावेश असावा, आधार सेंटरला बांधीव न ठेवता ओपन वेबसाईटवर कधीही कुठेही नवीन आधार टाकता यावे चूक दुरुस्ती करता यावे अशी सवलत एक खिडकी योजनेसारखी अमलात आणावी. अशा पाच मागण्या करण्यात आल्या.
सदर निवेदनाच्या प्रती यु आय डी ए आय प्रादेशिक कार्यालय मुंबई व यु आय आय डी ए आय मुख्य कार्यालय बेंगलोर यांनासुद्धा देण्यात आल्या.
निवेदन देताना रोशनी एजुकेशन चे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट आयुब खान, मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, सिकलिगर जमातीचे अन्वर सिकलिगर, सोसायटीचे सहसचिव मोहसिन खान व अब्दुल पेट्रोलियमचे वसीम खान हे उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी सदर मागण्याबाबत निश्चितच यु आय डी ए ला योग्य त्या शिफारशीसह निवेदन सादर करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Previous articleमुस्लिम मंच तर्फे ३६ व्या दिवशी उपोषण सुरू , “जमात-ए-इस्लामी, जी आय ओ, एस आय ओ व एमपीजे या संघटनांचा सहभाग”
Next articleलोकशाही पंधरवाडा निमित्ताने जनजागृती रॅलीचे आज आयोजन
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here