Home जळगाव मुस्लिम मंच तर्फे ३६ व्या दिवशी उपोषण सुरू , “जमात-ए-इस्लामी, जी आय...

मुस्लिम मंच तर्फे ३६ व्या दिवशी उपोषण सुरू , “जमात-ए-इस्लामी, जी आय ओ, एस आय ओ व एमपीजे या संघटनांचा सहभाग”

137

शरीफ शेख

रावेर , दि. ०१ :- जळगाव मुस्लिम मंच तर्फे सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा शुक्रवार ३६ वा दिवस या दिवशी जळगाव शहरातील जमात-ए-इस्लामी हिंद, स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन, गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ,मोमेंट फॉर पीस अँड जस्टिस या संघटनांच्या पुरुष व महिला तसेच तरुणाईने प्रत्यक्ष सहभाग नोंदवून आपला भारतीय नागरिकत्व कायद्याला तसेच एन आर सी व एन आर पी ला विरोध दर्शविला.

*उपोषणाची सुरुवात*

शिवबान फाईज या तरुणाने पवित्र कुराण पठण केले व वाजिद शेख यांनी हमद सादर करून उपोषणाला सुरुवात केली सर्वप्रथम जमात-ए-इस्लामी हिंद चे शहराध्यक्ष मुस्ताक मिर्झा, एस आय ओ चे अध्यक्ष रेहान फझल व शबाना देशमुख, जी आय ओ चे प्रमुख आशा देशमुख, एमपीजे चे महमूद खान, सोहेल अमीर व समी साहब यांनी मार्गदर्शन केले मौलाना अहमद मिल्ली यांनी तर्जुमा सादर केला इमरान शेख व अल्फ़ैज़ पटेल व अकील पठाण यांनी नारे दिले.
सौ नसरीन महमूद खान, कुमारी हीना पटेल, करीम सालार, गफ्फार मलिक, मुकुंद सपकाळे व फारूक शेख यांची समयोचित भाषणे झाली.
*गर्ल्स विंग तर्फे विविध उपक्रम*
या साखळी उपोषण दरम्यान गर्ल्स विंग च्या तरुणाईने रस्त्यावरून जाणारे-येणारे यांना आपले विरोध का व कशासाठी आहे हे पटवून देण्यासाठी त्यांना एक छोटी मराठीतील पुस्तिका तसेच हातात घालायला फॅन्सी बँगल्स त्याचप्रमाणे भारताचे राष्ट्रीय ध्वज हे रंगकाम करण्यासाठी त्यांच्या हाताचे पंजे घेतले अशाप्रकारे त्यांनी आपले विरोध प्रकट केले.

*अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन*
जमात-ए-इस्लामी, जी आय ओ, एस आय ओ व एमपीजे यांच्या पदाधिकाऱ्यांनी व महिलांनी अप्पर जिल्हाधिकारी बेडसे यांना हा कायदा रद्द करा व एन आर सी ची अंमलबजावणी करू नका या स्वरूपाचे निवेदन सादर केले.