Home मराठवाडा प्रशिक्षनार्थी आयपीएस पोलीस अधिकारी परतूर ला येणार,या बातमीने अवैध धंदे चालकाच्या तंबूत...

प्रशिक्षनार्थी आयपीएस पोलीस अधिकारी परतूर ला येणार,या बातमीने अवैध धंदे चालकाच्या तंबूत घबराट

92
0

परतुर प्रतिनिधी – लक्ष्मीकांत राऊत

जालना , दि. ०१ :- लोकसेवा आयोगाच्या थेट परीक्षेतुन निवड झालेले आयपीएस अधिकारी श्री तांबे हे येत्या काही दिवसात परतुर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारणार ,याची कुणकुण कानी पडताच शहरातील अवैध धंदे चालकाच्या तंबूत चांगलीच घबराट पसरली आहे.

आयपीएस अधीकारी श्री तांबे सध्या जालना पोलीस मुख्यालयात कार्यरत असून 15 फेब्रुवारी पासून ते परतुर पोलीस ठाण्यात प्रशिणार्थी अधिकारी म्हणून पदभार सांभाळणार असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.
परतुर शहरात गेल्या काही दिवसात अवैध धंदे चालकांवर तशी परतुर पोलिसांनी बऱ्यापैकी कारवाई चा धडाका लावल्याने हात चोळत बसलेले मटका किंग,वाळू माफिया, अवैध दारुविक्री करणारे , पत्याचे जुगार अड्डे चालवणारे तसेच गुटका किंग चिंतेत असतानाच आता त्यांच्यासाठी आणखी एक चिंता वाढवणारी वाईट बातमी समोर आली आहे.श्री तांबे यांनी काही दिवसांपूर्वी परतुर ला भेट दिली असता वाळूमाफिया वर व विना कागदपत्रे असणाऱ्या चारचाकी वर धडाकेबाज कारवाई करून आपल्या कडक कामाचा इशारा दिलेला आहे. आता 15 फेब्रुवारी रोजी पोलीस अधिकारी तांबे यांनी सूत्र हाती घेतल्यावर आपल्याला गाशा गुंडाळून ठेवावा लागेल ही भीती सध्या अवैध धंदेचालकात पसरली आहे.यात परतुर ची साईबाबा यात्रा 2 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे, या यात्रेत नेहमी चालणारा चक्री जुगार व इतर अवैध धंदेचालकात ही खळबळ उडालेली दिसत आहे, परतुर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साईबाबा यात्रेत
यावेळी पोलीस कडक भूमिकेत दिसू शकतात,कोणत्याही प्रकारचा जुगार ,मटका, वा इतर अवैध धंदे चालू दिले जाणार नसल्याचे संकेत पोलीस सूत्रांनी दिले आहेत. यामुळे जुगार चालक चिंताग्रस्त आहेत. त्यात युवा आयपीएस अधिकारी तांबे यांच्या शिस्तबद्ध कारभाराच्या चर्चा सुरू असल्याने मोठी घबराट पहायला मिळते आहे.
एकूण या सर्व माहिती व चर्चा ने
सामान्य जनतेतुन मात्र आनंद व उत्सुकता दिसून येत आहे.

Previous articleमैत्रिणींसमोर छेड काढल्याने शालेय विद्यार्थिनीची आत्महत्या
Next articleमुस्लिम मंच तर्फे ३६ व्या दिवशी उपोषण सुरू , “जमात-ए-इस्लामी, जी आय ओ, एस आय ओ व एमपीजे या संघटनांचा सहभाग”
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here