Home मराठवाडा लोकशाही पंधरवाडा निमित्ताने जनजागृती रॅलीचे आज आयोजन

लोकशाही पंधरवाडा निमित्ताने जनजागृती रॅलीचे आज आयोजन

183

नांदेड दि. 01 :- ( राजेश भांगे ):- लोकशाही पंधरवाडा 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2020 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. लोकशाही, निवडणूक व सुशासन ही संकल्पना जनमाणसात रुजुन मतदारांचा लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढविणे, मतदार यादीत नाव समाविष्ट आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी सुचीत करणे, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आदीसाठी जनजागृती व्हावी यासाठी शनिवार 1 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 8 वा. रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही रॅली शनिवार 1 फेब्रुवारी 2020 रोजी महात्मा फुले पुतळा, आयटीआय कॉर्नर पासून सुरु होऊन शिवाजीनगर, कलामंदिर, वजिराबाद चौरस्ता ते बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे समारोप होईल, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड यांनी कळविले आहे.