Home महत्वाची बातमी पतीचा खून करणाऱ्या पत्नीस व तिच्या प्रियकरास जन्मठेप ची शिक्षा

पतीचा खून करणाऱ्या पत्नीस व तिच्या प्रियकरास जन्मठेप ची शिक्षा

107

चिखली येथे घडला होता खुनी थरार

अमीन शाह

बुलढाणा , दि. ०१ :- प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणारया पत्नीसह प्रियकरास येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एम.के. महाजन यांनी जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावास अशी शिक्षा ३१ जानेवारी रोजी सुनावली आहे.
संभाजी नगर, चिखली येथील फिर्र्यादी शंकर मनिराम देव्हरे यांनी चिखली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार १७ जाने. २०१८ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सुन संगीता संजय देव्हरे हिने फोन करुन माहिती दिली की, तीचा पती शंकर देव्हरे वय २९ हा घरात हातपाय खोरत असून तुम्ही लवकर घरी या असे सांगीतले. माझ्यासह नातेवाईकांनी संजय भाड्याने राहात असलेल्या किरण मोरे यांच्या घरी जावून पाहिले असता त्याच्या गळ्यावर व्रण असल्याचे दिसून आले. त्यानंतर तपास अधिकारयाने घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा केला असता मृतकाच्या गळ्याभोवती दोरीने आवळल्याच्या जखमा दिसून आल्या. त्यानंतर या खून प्रकरणातील आरोपी पत्नी संगीता हिस विचारपूस केली असता तीने १६ जाने. २०१८ रोजी आतेभाऊ सुनिल दुंडीयार व मृतक संजय हे दोघे दारु पिवून घरी आले. त्यानंतर सुनिल याने पतीच्या दारुमध्ये झोपेचे गोळी टाकुन पुन्हा त्यास दारु पाजली. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पती झोपलेले असतांना जीवे मारण्याची धमकी देवून पतीचे हात पकडण्यास सांगीतले. त्यानंतर आतेभाऊ सुनिलने साडीच्या सहाय्याने पतीने तोंड व नाक दाबून दोरीच्या सहाय्याने गळा आवळून पतीचा खून केला. त्यानंतर सकाळी निघून गेला. तपासाअंती हे खून प्रकरण न्यायालयात प्रविष्ट करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने .१३ साक्षी नोंदविण्यात आल्या.
दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकुण येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एम.के.महाजन यांनी पत्नी व प्रियकरास जन्मठेपेसह प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. तसेच दंडाच्या रकमेपैकी ९ हजार रुपये फिर्यादी व त्याच्या पत्नीस नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेशसुध्दा पारीत केला आहे. प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड.वसंत भटकर यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी म्हणून पोहेकॉ सुनिल पवार यांनी सहकार्य केले.