Home मराठवाडा ‘बज्म – ए – बशर’च्या वतीने १ फेब्रुवारीला आदी रामचंद्र यांची गझल...

‘बज्म – ए – बशर’च्या वतीने १ फेब्रुवारीला आदी रामचंद्र यांची गझल मैफिल.

54
0

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. ०१ :- शायरीच्या क्षेत्रात अद्वितीय कर्तृत्व असणाऱ्या दिवंगत बशर नवाज यांच्या स्मरणार्थ ‘बज्म – ए – बशर’ ग्रुप आणि महात्मा गांधी मिशन यांच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी गझल गायक-संगीतकार आदी रामचंद्र यांच्या ‘सुकून’ या गझल मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी १ फेब्रुवारी रोजी एमजीएमच्या संकुलातील आर्यभट्ट सभागृहात सायंकाळी साडे सहा वाजता ही मैफिल होणार आहे. त्यात आपल्या बशर नवाझ यांच्यासोबतच अनेक नामवंत शायर आणि गायकांनी अजरामर केलेल्या गझलांचा गुलदस्ता आदी रामचंद्र पेश करणार आहेत. त्यांच्यासोबत प्रमोद जांभेकर (व्हायोलिन), मिलिंद शेवरे (गिटार), अमोल सोनकर (की बोर्ड), मिलिंद डोलारे (हार्मोनियम) आणि जगदीश व्यवहारे ( तबला) हे कलाकार साथसंगत करणार आहेत. महेश अचिंतलवार सूत्रसंचालनाची बाजू सांभाळणार आहेत.
हा कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य आहे. या कार्यक्रमाला गझल रसिक आणि बशर नवाजप्रेमींनी आवर्जून यावे असे आवाहन ‘बज्म – ए – बशर’ ग्रुपचे संदीप सिसोदे, ऍड. अभिजित विटोरे, सोहेल झाकीउद्दीन आणि एमजीएम यांच्या वतीने करण्यात आले आहे.