Home बुलडाणा शेगाव तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहिर

शेगाव तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहिर

230

अध्यक्षपदी राजेश चौधरी कार्याध्यक्ष नंदू कुलकर्णी सरचिटणीस देवानंद उमाळे , उपाध्यक्ष फहिम देशमुख

अमीन शाह

शेगाव , दि. २१ :- मराठी पत्रकार परिषद सलग्नित शेगाव तालुका पत्रकार संघाची संयुक्तिक नुतन कार्यकारिणीची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांनी केली.
यात अध्यक्षपदी राजेश चौधरी तर कार्याध्यक्षपदी नंदू कुलकर्णी व सरचिटणीस पदी देवानंद उमाळे यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच उर्वरीत कार्यकारणीत उपाध्यक्षपदी फईम देशमुख, अमर बोरसे, कोषाध्यक्ष विजय मिश्रा, सहसचिव दिनेश महाजन , धनराज ससाने,तर कार्यकारणी सदस्य म्हणून नानाराव पाटील, देविदास कळसकर, श्याम देशमुख , निमंत्रित सदस्य म्हणून अनिल उंबरकार व संजय सोनोने यांचा समावेश आहे. मराठी पत्रकार परिषद परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांच्या आदेशानुसार, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण जैन यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी गठीत झाली असून मराठी पत्रकार परिषदेची संलग्नता प्रदान करण्यात आली आहे. ही संयुक्तिक कार्यकारिणी सन 2020 – 21 ते 2021-22 या दोन वर्षाच्या कालावधीसाठी राहील. अशी माहिती जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य अनिल उंबरकार यांनी दिली.