Home मराठवाडा नांदेडमध्ये 7 वीतील विद्यार्थिनीवर शिक्षकांनीच केले अत्याचार , नागरिकांमध्ये तीव्र संताप..

नांदेडमध्ये 7 वीतील विद्यार्थिनीवर शिक्षकांनीच केले अत्याचार , नागरिकांमध्ये तीव्र संताप..

40
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड , दि. २१ :- शालेय विद्यार्थिनीवर शिक्षकांनीच अत्याचार केल्याची खळबळनक घटना नांदेडमध्ये घडली आहे. शंकरनगरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. आरोपींवर कारवाई व्हावी, अशी मागणी करत सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष नागसेन जिगळेकर अंकुश वाघमारे, ब्रह्मा कांबळे, जयदीप कांबळे किशोर वाघमारे, श्रीकांत कांबळे, आसिफ शेख, सदा वाघमारे यांनी शैक्षणिक बंद पुकारला होता आणि निषेध सभेचे आयोजन केले होते तसेच येथील नागरिकांनी आज शंकरनगरमध्ये बंद पाळून रास्तारोकोही केला.
यावेळी एसएफआय चे राज्याध्यक्ष बालाजी कलेटवाड युवा पँथर प्रमुख राहूल प्रधान लोकस्वराज्य आंदोलन प्रमुख रामचंद्र भरांडे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिरसे वंचित बहुजन आघाडी महिला आघाडीचे जिल्हा अध्यक्ष दैवशाला पांचाळ रिपब्लिकन सेनेचे माधवदादा जमदाडे टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष बालाजी जाधव गुरू रविदास समता परिषदेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर लहुजी शक्ती सेनेचे बारहाळीकर एम आय एम चे गौसभाई रामतीर्थकर शिवसेना तालुका अध्यक्ष बाबाराव रोकडे उपस्थित होते.
शंकरनगरमध्ये इयत्ता 7 वीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर 2 शिक्षकांनी अत्याचार केले. भाजपा उपाध्यक्ष आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर अध्यक्ष असलेल्या शाळेत ही घटना घडली आहे. शाळेतील मुलीवर 2 महिन्यापूर्वीच अत्याचार करण्यात आले. त्यानंतर आता मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे हा सर्व प्रकार उघडीस आला.
अत्याचाराची ही घटना समोर आल्यानंतर आरोपी 2 शिक्षकांसह घटनेची माहिती न देणाऱ्या अन्य 3 अशा एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेविरोधात गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप परसल्याचं पाहायला मिळालं. आरोपींच्या अटकेसाठी गावकऱ्यांनी आंदोलनही केलं आहे. तसंच रास्तारोको करण्याचाही प्रयत्न झाला.
दरम्यान, शाळेत शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आल्याने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता समोर येत आहे.

Unlimited Reseller Hosting