Home विदर्भ न्यू व्हिजन अकादमीत स्पर्धा परीक्षेचा पुरस्कार सोहळा.!

न्यू व्हिजन अकादमीत स्पर्धा परीक्षेचा पुरस्कार सोहळा.!

19
0

सौ .पदमाताई प्र. मुंजेवार

वर्धा , दि. २१ :- जिल्ह्यातील सेलू येथील न्यू व्हिजन अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना रविवारी आयोजित एका कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
न्यू व्हिजन अकादमीच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परिक्षेच्या पुर्वतयारीच्या दृष्टीकोनातून दरवर्षी स्पर्धा परीक्षा आयोजित केली जाते. यामध्ये तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयातील १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. नुकताच या स्पर्धा परिक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला. या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार वैष्णवी अशोक वाघमारे, द्वितीय मितांश प्रशांत देवतारे तर तृतीय निशा राधेश्याम डुकरे यांनी बाजी मारली. प्रोत्साहनपर पुरस्कारावर सुमित प्रशांत बोबडे याने आपले नाव कोरले. रविवारी आयोजित पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना शिल्ड, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन संचालक प्रा. किशोर ढोरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू व्हिजन अकादमीचे संचालक प्रा. किशोर ढोरे तर प्रमुख अतिथी म्हणून चेतन नेवाळे, महेश पुनस्कर, शंकर दांडेकर, हितेश हरिणखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन पूजा देवतारे यांनी तर आभार वैष्णवी खराबे यांनी मानले.

Unlimited Reseller Hosting