Home विदर्भ तुषार पुंडकर हत्याकांडात दुचाकी जप्त उद्या तिन्ही आरोपींना आकोट न्यायालयात हजर करणार

तुषार पुंडकर हत्याकांडात दुचाकी जप्त उद्या तिन्ही आरोपींना आकोट न्यायालयात हजर करणार

113

देवानंद खिरकर

अकोट

-प्रहारचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांची 21 फेब्रुवारिला अतिशय प्लॅनिंग करून पोलीस वसाहतीत हत्या करण्यात आली होती.तुषार पुंडकर हत्याकांडात आता पर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली होती त्यातील मुख्य आरोपी पवन सेदानी,अलपेश दुधे,श्याम नाठे,इंदोर येथील निखील सेदानी,गुंजन चिंचोले,यास अटक करण्यात आली होती,त्यातील आरोपी अलपेश दुधे व श्याम नाठे याने इंदोर येथील निखिल सेदानी याच्या कडून अग्निशसत्र उपलब्ध करून घेतले त्या साठी त्यांनी त्यांचा जवळचा मित्र राम म्हैसने याने गाडी दिली असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे तरी पोलिसांनी राम म्हैसने याची दुचाकी जप्त केल्याचे समजले.