Home मराठवाडा नायगांव (बा) येथील कापुस केंद्र संचालकांनी कापुस खरेदी सुरू करावे अडचणी आल्यास...

नायगांव (बा) येथील कापुस केंद्र संचालकांनी कापुस खरेदी सुरू करावे अडचणी आल्यास सोडविल्या जातील – जिल्हाधिकारी डाॕ. विपीन इटनकर

303

नांदेड, दि.५ :- राजेश भांगे – नांदेड जिल्लाधिकारी डाॕ. विपिन इटनकर यांनी नायगांव (बा) येथील कापुस खरेदी केंद्राला भेट देऊन कापुस खरेदि संदर्भात उपविभागीय अधिकारी शरद झारके , नायगांव तहसिलदार नांदे , नायगांव कापुस खरेदी केंदाचे संचालक डि.बी.पाटील होटाळकर , शिवराज पाटील होटाळकर तसेच कुंटुर येथील कापुस खरेदी केंद्राचे संचालक राजेश देशमुख कुंटुरकर , व सी.सी.आयचे अधिकारी सोनवणे, क्रषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कदम यांची बैठक घेतली.

या बैठकी मध्ये गांव निहाय कापुस खरेदी करण्यासाठी शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांची यादि तयार करण्याची तलाठी यांना यावेळी सुचित करण्यात आले.
कापुस खरेदी करण्या संदर्भात सी,सी.आयचे खरेदी अधिकारी सोनवणे यांनी सद्यस्थितीत कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावाने उपस्थित झालेल्या परिस्थिती मुळे येणाऱ्या अडचणी जिल्हाधिकारी इटनकर यांना सांगितल्या असता सर्व समस्या सोडविल्या जातील तरी आपण तरी आपण कापुस खरेदी करण्याची तयारी करावी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाहि अडचणी आल्यास पोलिस व महसुल प्रशासन आपणास सर्वत्तोपरी सहकार्य करेल अशी सुचना यावेळी नांदेड जिल्हाधिकारी डाॕ. विपीन इटनकर यांनी दिले.

अधिक माहितीसाठी नायगांव तहसिलदार यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले कि कोविड १९ कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता सामाजिक अंतर राखणे गरजेचे असुन तरी कापुस खरेदी केंद्रात एकावेळी फक्त १५ कापुस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी असुन. तलाठ्यांन मार्फत कापुस शिल्लक असल्या शेतकऱ्यांची गावनिहाय यादि नाव फोन नंबर असे तयार केली जाईल व मार्केट कमिटि कडे रजिस्ट्रेशन केल्या नंतर सीसीआय च्या अधिकाऱ्यांन कडे यादि येईल व दररोज फक्त १५ च शेतकऱ्यांना कापुस खरेदि केंद्रात फोन करून बोलाविले जाईल तरी यावेळी ज्या शेतकऱ्यांना फोन केले गेले त्यांनीच यावे, इतर शेतकऱ्यांनी अनावश्यक येवुन गर्दी करू नये अन्यथा कापुस खरेदि केंदावर विनाकारण येवुन गर्दी करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी सुचना नांदेड जिल्हाधिकारी डाॕ.विपीन इटनकर सरांनी यांनी कले आहे.

तरी शेतकऱ्यांनी सामंजस्याची भुमिका घेवुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलिसवाला आॕनलाईन मिडियाच्या माध्यमातुन नायगांव तहसिलदार नांदे यांनी केले.