Home मराठवाडा कोरोना लॉकडाउन परिस्थिती मध्ये पण डाक विभागाची देशसेवा

कोरोना लॉकडाउन परिस्थिती मध्ये पण डाक विभागाची देशसेवा

148
0

नांदेड – दि.४ रोजी बोधडी येथील कोरोना योद्धा म्हणून ग्रामीण डाक सेवक हे कोरोना लॉकडाउन मध्ये देखील ज्याचे दररोजच्या दररोज हातावरचे पोट आहे असे गरीब,निराधार महिलांचे पेन्शन चे पैसे नागरिकाच्या दारा दारात जाऊन वाटप करीत आहेत.

सध्या पोस्ट विभागात जनधन योजनाचे खातेधारक महिलांच्या खात्यावर केंद्र व राज्य सरकार पैसे त्यांच्या खात्यावर जमा करीत आहेत. ग्रामीण भागात याचे भार ग्रामीण डाक सेवकांवर असून डाक विभागाने ग्रहाकासाठी सोशेल डिस्टनस पाळत पैसे वाटप करत असल्याची गर्दी दिसून येत आहे.
सर्व जिल्ह्यात आटो,वाहन बंदी असल्याकारणाने ग्रामीण भागातील नागरिक,निराधार लाभार्थी, जेष्ठ नागरिक लाभार्थी, मातुरत्व वंदना लाभार्थी, जनधन योजना लाभार्थी पैसे उचलण्याची मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याचे चित्र दिसत असले तरी त्या मध्ये योग्य ते अंतर,ग्रहाकासाठी हॅन्ड वॉश,साबण ग्रहाकासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या तसेच डाक कर्मचाऱ्यांना मास्क तोंडावर लावून नियमांचे पालन करताना दिसून आले. ग्रामीण भागातील व शहरी भागातील डाक कर्मचारी प्रत्येक नागरिकाच्या दारी जाऊन पैसे उचलण्याची सुविधा व देशसेवा या कोरोनाच्या महामारीत करीत असल्याने सर्वत्र पोस्ट कर्मचाऱ्यांचे व डाक विभागाचे कौतुक होत आहे.