Home रायगड कर्जत तालुक्यातील मालेगावमध्ये बिबट्याला जाळले

कर्जत तालुक्यातील मालेगावमध्ये बिबट्याला जाळले

60
0

कर्जत – जयेश जाधव

कर्जत तालुक्यातील जंगलात काही भागात बिबट्याचा वावर आढळून येत असतो.कर्जत पूर्व रेंजमधील मालेगाव पिंपळपाडा भागातील जंगलात बिबटयाचा वावर असल्याचे लक्षात येताच विष टाकून किंवा शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बंदुका यांच्या माध्यमातून बिबट्याला ठार मारले.त्यानंतर बिबट्याची नखे तसेच दात काढून त्या बिबट्याला जाळण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान ,अर्धवट जाळालेल्या अवस्थेत असलेल्या बिबट्याबद्दल माहिती मिळताच वन विभागाने धावपळ करून बिबट्याचे नखे आणि दात हस्तगत केली,परंतु बिबट्याला जाळणारे मात्र वन विभागाच्या हाती लागले नाहीत.
पुणे जिल्ह्याची हद्द असलेल्या डोंगराच्या खाली कर्जत तालुक्यातील मालेगाव हे आदिवासी लोकांची वस्ती असलेले गाव आहे.३१ मार्च रोजी मालेगाव भागातील जंगलात एक बिबटा स्थानिक गुराखी यांना मृत अवस्थेत दिसून आला होता.बिबटयाला मारून त्याच्या पायाचे पंजे कापून नेले आहेत आणि दात देखील काढले असल्याचे स्पष्ट होताच वन विभागाला त्याची माहिती देण्यात आली.कर्जत येथून मालेगाव येथे वन विभागाच्या गाडी यायला किमान दोन तास लागणार होते. या कालावधीत काही अज्ञात लोकांनी त्या जंगलात जाऊन वन विभाग पोहचण्याआधी रॉकेल ओतून बिबट्याला जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू होता.कर्जत येथून वन अधिकारी एस डी वळवी,वनपाल दत्ता केवारी तेथे पोहचे पर्यंत संशयास्पद मृत्यू झालेला बिबट्या ९० टक्के जळून गेला होता.वन अधिकारी आले तेव्हा बिबट्याचा तोंडाकडील भाग अर्धवट अवस्थेत जळत होता. वन विभागाने आग विझवून बिबट्याचे अवशेष तपासले असता त्या बिबट्याचे सर्व चार पायाचे पंजे त्या बिबट्याला नसल्याचे दिसून आले तसेच जबड्यातील दात देखील नसल्याचे दिसून आले.त्यानंतर वन विभागाने स्थानिक दोन गावातील गावकरी यांची कसून चौकशी केली असता त्या बिबट्याच्या पायाची १९ नखे आणि चार दात हे एका घरातून ताब्यात घेतले.बिबट्याच्या चार पायांना असलेल्या २० नखांपैकी १९ नखे त्या व्यक्तीकडे सापडली असून एक नख मात्र गायब होते,त्यामुळे ते एक नख गेले कुठे?असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.वन विभागाने ही कारवाई १ एप्रिल रोजी करून संबंधित प्रकरणी एका तरुणावर वन्यप्राणी संरक्षण अधिनियम १९७२ चे ९,३९,४८,५०,५१ अन्वये वन विभागाने गुन्हा दाखल