जळगाव

शिदांड येथे घरोघरी जाऊन कोरोना बाबत केला सर्वे…!

प्रशासनाने बाहेरून आलेल्या शिंदाड गावातील लोकांची घेतली नोंद…!!

निखिल मोर

पाचोरा – तालुक्यातील शिंदाड येथे प्रशासनाने गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन गावात पुणे व मुंबई येथुन पाहुणे मंडळी किंवा नौकरी निमित्त बाहेरगावी गेलेले कोणी परत गावी आलेलं आहे का? याबाबत चा नुकताच आज गावात घरोघरी जाऊन माहिती घेवुन त्यांची रजिस्टराला नोंद घेण्यात आली.यावेळी शिंदाड गावाचे सरपंच रविंद्र विक्रम पाटील,तलाठी गणेश मगावकर,गावाच्या पोलिस पाटील आश्चर्या श्रीकृष्ण पाटील,कोतवाल जयश्री बालु श्रावणे,ग्राम पंचायत सदस्य सदाशिव नारायण पाटील,आनंदा शाहादु पाटील,शरिफ कादर खाटिक,तसेच ग्राम पंचायत कर्मचारी व आशा सेविका ,आरोग्य सेविका,अंगणवाडी सेविका,पञकार बांधव उपस्थित होते.यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ मंडळीनी चांगला प्रतिसाद देत प्रशासनाला सहकार्या केले.प्रशासनाकडुन शोध मोहिम चांगल्याप्रकारे राबविल्या जात असल्याने ग्रामस्थांनी संमाधान व्यक्त केले आहे या सोबतच प्रशासनातर्फे कोरोना संदर्भातील जनजागृती करण्यात आली या मध्ये व नागरिकांना या गंभीर आजारा संदर्भातील अनेक गोष्टी सांगितल्या व या आजारा पासून वाचण्या साठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे ६० वर्षा वरील रुद्धनी व १० वर्षा खलील बालकांनी घराबाहेर निघणे टाळावे वेळेवेळी प्रशासनातर्फे ज्यासुचना दिल्या जातील त्यांचे पालन करणे व आपले जीवन वाचवा व प्रशासनाला सहकार्य करावे.

You may also like

जळगाव

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी केली जम्बो कार्यकारिणी जाहीर… आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप…

अमळनेर  –  येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी आमदार अनिल ...
जळगाव

ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहुउद्देशिय सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या संकल्पित बहुउद्देशिय सभागृहाच्या ...
जळगाव

आरटीई नुसार झालेल्या प्रवेशप्रक्रियेच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वावडदा येथील पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले निवेदन रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश ...