Home राष्ट्रीय कोरोना महामारीशी लढण्यासाठी अजीम प्रेमजी करणार ५० हजार कोटींची मदत

कोरोना महामारीशी लढण्यासाठी अजीम प्रेमजी करणार ५० हजार कोटींची मदत

30
0

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

दिल्ली – देशात आणि ज्याप्रमाणे कोरोना विषाणूचे थैमान वाढत चालले आहे तसा मदतीचा ओघही सुरू झाला आहे. सुप्रसिद्ध दानशूर उद्योजक म्हणून ओळख असलेल्या अजीम प्रेमजी यांनी कोरोना महामारीशी लढण्यासाठी एकूण ५० हजार कोटींची संपत्ती दान करण्याची घोषणा केली आहे.
अजीम प्रेमजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शिक्षण आणि नोकरीसाठी यापूर्वीही ते मदत करत आले आहेत. आपल्या ताब्यात असलेले कंपनीचा ३४ टक्के हिस्सा त्यांनी या पूर्वीच दान केला होता. फॉर्ब्जनुसार त्यांची एकूण संपत्ती ५.२ अब्ज डॉलर म्हणजे ३६ हजार कोटी इतकी आहे. आतापर्यंत त्यांनी २१ अब्ज डॉलर म्हणजे १ लाख ४७ हजार कोटी इतकी रक्कम दान केली आहे. शिक्षण क्षेत्रासाठी उत्तर पूर्व भारतात त्यांनी उपक्रम सुरू केले आहेत.

Unlimited Reseller Hosting