Home महत्वाची बातमी राज्यात आजपासून संचारबंदी जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करणार – मुख्यमंत्री

राज्यात आजपासून संचारबंदी जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करणार – मुख्यमंत्री

456
0

राजेश भांगे

मुंबई – कोरोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे , मी सर्वाना काळजीपोटीच आपल्याला या सुचना देतो.
आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगात होते आहे तसे थैमान होईल
एक लक्षात घ्या, कालचा दिवस होता त्यासाठी मी आपल्याला धन्यवाद दिलेच आहे. सर्वांनी जनता कर्फ्यू चांगला पाळला. थाळ्या, घंटा वाजविल्या पण हे सगळे कोरोनाला घालविण्यासाठी नव्हते तर वैद्यकीय क्षेत्रात सतत काम करीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी होते.
काल राज्यात १४४ कलम लावले होते आता मला राज्यात संचार बंदी लावावी लागते आहे.
खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी असेल तरच सुरु राहतील. रिक्षा, टैक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल.
काल आपण इतर राज्याच्या सीमा बंद केल्या होत्या आज आपण राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करीत आहोत. या वाहतूक बंदीत खासगी वाहने देखील आली.
देशांतर्गत विमानतळ तत्काळ बंद करावे अशी विनंती मी पंतप्रधानांना केली आहे
जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील.
खुपदा विनंती करूनही पालन होत नसल्याने मला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत आहे.
सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे पूर्णपणे बंद राहतील
प्रसंगी आशा, अंगणवाडी, होमगार्ड्स यांना देखील वैद्यकीय बाबतीत प्रशिक्षण देऊन तयार करीत आहोत.
सर्व माध्यमांना देखील मी धन्यवाद देतो. कोरोनाविषयी आपण चांगली जनजागृती करीत आहात.
ज्यांना प्रादुर्भाव झालेला नाही त्यांनी देखील काळजी घेणे खूप आवश्यक आहे.
घरी विलगीकरण केलेल्यांनी सरकारच्या सूचना पाळायच्या आहेत
ही कठोर पाउले केवळ जनतेच्या हितासाठी आहेत.

नांदेड जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप वर अत्यावश्यक वाहनांना सोडुन, इतर कोणत्याही खाजगी वाहनांसाठी दि,२३ मार्च दुपारी १२ वा.पासुन ते ३१ मार्च रात्री १२ वा.पर्यंत सेवा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड डाॕ, विपिन इटनकल यांनी दिले होते पण नंतर ते निर्णय बदलल्याचे समजले.

Previous articleलॉक डाऊन ची ऐशी – तेशी मुख्यमंत्री , आरोग्य मंत्री , प्रधानमंत्रीचही ऐकणार नाही का ?
Next articleजिल्ह्यातील महानगरपालीका, नगरपरीषद व नगरपंचायत या नागरी भागात जमाव बंदि आदेश लागू  – जिल्हाादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here