Home महत्वाची बातमी लॉक डाऊन ची ऐशी – तेशी मुख्यमंत्री , आरोग्य मंत्री , प्रधानमंत्रीचही...

लॉक डाऊन ची ऐशी – तेशी मुख्यमंत्री , आरोग्य मंत्री , प्रधानमंत्रीचही ऐकणार नाही का ?

49
0

प्रतिनिधी मुंबई – रवि गवळी

महाराष्ट्र राज्यात सर्वत्र संचरबंदी लागू , सर्व जिल्ह्याच्या सीमा ब्लॉक !

स्वतःला घरात बंधिस्त करून घेवून व घरात सुद्धा अंतर बाळगन पुढील काही काळ घालवणे हे आरोग्याचे राष्ट्रीय व जागतिक नियम पाळले पाहिजेत. तरी नागरिक हि गंभीर बाब मनावर न घेता मालाड पूर्व दफ्तरी रोड बचनीनगर रस्त्यारस्त्यावर व घोळक्याने फिरत
आहेत. आज दिनांक 23/3/2020 रोजी संध्याकाळी 5 वाजता दफ्तरी रोड येथील असणारे जनरल स्टोअर वर नागरिकांनी घोळक्याने सामान खरेदीसाठी घरा बाहेर रस्त्यावर येत होते .

जे अतिशय गंभीर आहे. आपण सर्वांनी सतर्क रहाणे अतिशय गरजेचे आहे. कोणत्याही जागी कोरोना बाधित व्यक्तीचा संपर्क झाला आहे तिथे कुठल्याही वस्तूचा कोरोना बसलेला आहे , जो आपल्या साध्या डोळ्याना दिसणार नाही. याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने त्वरित शासनाने वेळोवेळी केलेल्या सुचानाचे काटेकोरपणे पालन करून आपले स्वतःचे, कुटुंबाचे, मित्राचे, समाजाचे व देशाचे आरोग्य सुरक्षित ठेवावे या करीता पत्रकार संरक्षण समिती तर्फे व शासनाच्या वतीने आपणास कळकळीची विनंती करण्यात येत आहे.