Home मराठवाडा संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती जालना जिल्ह्यात उद्भवु नये यासाठी पुर्वतयारी ,

संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती जालना जिल्ह्यात उद्भवु नये यासाठी पुर्वतयारी ,

61
0

सय्यद नजाकत

जालना दि. 23 – आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत नोव्हेल कोरोना विषाणु (nCON19) संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे व इतर प्रवास माध्यमाद्वारे प्रवासी भारतात विवधि भागांत प्रवास करीत आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूचे संसर्गात अधिक वाढ होवू नये म्हणुन त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. तसेच सदर संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती जालना जिल्ह्यात उद्भवु नये यासाठी पुर्वतयारी करणे बाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.
या पार्श्वभुमीवर अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा तहसिलदार श्रीकांत भुजबळ, जालना यांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30 (2), 33 व 63 अन्वये प्राप्त अधिकारानुसार तालुका नियंत्रण कक्ष, तहसलि कार्यालय, जालना येथे नोव्हेल कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पुर्वतयारी व प्रत्यक्ष अंमलबजावणी इत्यादीच्या अनुषंगाने तालुकास्तरावर स्वतंत्र नोव्हेल कोरोना विषाणुच्या प्रभावी नियंत्रणासाठी तालुका नियंत्रण कक्ष 24 X 7 कार्यरत ठेवण्यात आलेला असून नियंत्रण कक्षासाठी दुरध्वनी क्रमांक 02482-2225296 कार्यरत करण्यात आलेला आहे. तसेच या बाबत समन्वय ठेवण्यासाठी तहसिल कार्यालय जालना नायब तहसीलदार महसुल-1 शैलेश राजमाने, नायब तहसीलदार महसुल-2, तुषार निकम,यांची नोडल अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली असल्याचे तहसिलदार श्रीकांत भुजबळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Unlimited Reseller Hosting