Home विदर्भ कु.सोनम राहणे अकोला जिल्ह्यात प्रथम

कु.सोनम राहणे अकोला जिल्ह्यात प्रथम

63
0

अब्दुल शकीब ,

हिवरखेड प्रतिनिधी:-

एन.एम. एम.एस.परीक्षेच्या निकालात हिवरखेड नजीकच्या सौंदळा येथील श्री अंबिकादेवी विद्यालयाची विद्यार्थिनी कु.सोनम सुरेश राहणे हिने सर्वसाधारण गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली आहे. कुठल्याही शिकवणी शिवाय तीने हे यश संपादन करून ग्रामीण भागातील विद्यार्थी बुद्धिमत्तेच्या बाबतीत शहरी विद्यार्थ्यांच्या मागे नाहीत हे सिद्ध केले आहे. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या सोनम ने यापूर्वी सुद्धा अनेक पुरस्कार मिळविले आहेत. तुषार कोल्हे सरांच्या मार्गदर्शनात या विद्यालयाचे विद्यार्थी सार्थक मदन मिरगे, कु.प्रेरणा शिवदास सांगोळे, कु.नयन प्रशांत झापर्डे, रितेश राजेश दारोकार, कु.रेणुका गजानन तिखट हे विद्यार्थी सुद्धा या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या विद्यालयात आजूबाजूच्या सहा गावातील तसेच आदिवासी समाजातील विद्यार्थी शिक्षण घेत असून या विद्यालयाची प्रगती नेत्रदीपक आहे. दरवर्षी या विद्यालयाचे विद्यार्थी या शिष्यवृत्ती साठी पात्र होत असतात. कु.सोनमच्या या यशाबद्दल वर्ग शिक्षक प्रदीप खूपासे, मार्गदर्शक तुषार कोल्हे, प्रवीण चांदूरकार, शैलेश तराळे यांनी तिचे घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. ती आपल्या यशाचे श्रेय सर्व शिक्षकवृंदाना देते. तिने मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल संस्थाध्यक्ष शंकरराव पुंडकर व प्राचार्य ठाकरे सर यांनी तिचे अभिनंदन केले.

Unlimited Reseller Hosting